TIKTOK मुळे चाहत्यांना मिळाली दुसरी करीना कपूर

यिनबझ टीम
Wednesday, 12 February 2020

अनेक डायलॉग्सवर लिप सिंकिंग करणारे तरुण आणि तरुणी सध्या चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत, त्यातच अजुन एक व्यक्ती अशाच टिकटॉकमुळे व्हायरल होत आहे, ती म्हणजे दुसरी करीना कपूर

देशात tiktok अॅप आल्याने एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली; ती म्हणजे देशात कलाकारांची काहीच कमी नाही, हे समजून आलं. या tiktok मुळे अनेकजण आता टिकटॉक स्टार म्हणून ओळखले जात आहेत. अनेक डायलॉग्सवर लिप सिंकिंग करणारे तरुण आणि तरुणी सध्या चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत, त्यातच अजुन एक व्यक्ती अशाच टिकटॉकमुळे व्हायरल होत आहे, ती म्हणजे दुसरी करीना कपूर (kareena kapoor).

टिकटॉकमुळे असे अनेक चेहरे समोर आले आहेत, ज्यांचे चेहरे अनेक सुप्रसिध्द अभिनेते किंवा अभिनेत्रींच्या चेहऱ्याशी मिळते जुळते आहेत. मग ते मधुबाला, श्रीदेवी, करिश्मा कपूर, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, कैटरीना कैफ, जरीन खान असो किंवा सगळ्यांची लाडकी आणि आपल्या अभिनयाने सगळ्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी करीना कपूर असो.

टिकटॉकवर एका तरुणीचे व्हिडीओ व्हायरल खूपच होत आहेत. जिचा इंटरनेटवर खूप मोठा फॅनफॉलोअर तयार झाला आहे. सोबतच टिकटॉकची करीना कपूर (Tiktok kareena kapoor) म्हणून देखील तिला नवी ओळख देण्यात आली आहे. करिना कपूरसारखे केस, करिना सारखा मेकअप आणि तिच्यासारखीच ड्रेसिंग, अशा पोशाखात असलेल्या टिकटॉकच्या करिना कपूरचं नाव आहे शनाया सचदेवा (shanaya-sachdeva).

शनाया ही करिनाच्या अनेक गाण्यांवर आणि डायलॉग्सवर लिप सिंक करते, काहीदा करीनाची मिमिक्रीदेखील करते. शनायाने अजूनपर्यंत जब वी मेट, मैं प्रेम की दीवानी हूं, कभी खुशी कभी गम अशा करीनाच्या अनेक चित्रपटांच्या डायलॉग्सवर व्हिडीओ तयार करून शेअर केले आहेत.

टिकटॉकवर सध्या तिचे 1 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर तिच्या प्रत्येक व्हिडीओला हजारो लाईक्स आणि कमेंटदेखील मिळत असतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News