tiktok मुळे रचला हत्येचा कट; tiktok स्टार अटकेत

यिनबझ टीम
Wednesday, 4 March 2020

सध्या टिकटॉकमुळे अनेक गुन्हे घडताना आपल्याला पाहायला मिळतात. चुकीच्या ठिकाणी, चुकीचे प्रयोग, चुकीचे शब्द उच्चारणे अशा गोष्टी अनेक टिकटॉक विरांकडून होत असतात.

मुंबई - सध्या टिकटॉकमुळे अनेक गुन्हे घडताना आपल्याला पाहायला मिळतात. चुकीच्या ठिकाणी, चुकीचे प्रयोग, चुकीचे शब्द उच्चारणे अशा गोष्टी अनेक टिकटॉक विरांकडून होत असतात. असाच एक गुन्हा मुंबईतल्या गांधीनंगर परिसरात घडला आहे. टिकटॉक व्हिडीओ करताना tiktok स्टार किर्ती पटेल हिच्या मैत्रीणीकडून चुकीचा शब्द वापरला गेल्याने दोन गटांमध्ये किरकोळ वाद निर्माण झाला होता.

सुरतला राहाणारी टिकटॉक स्टार किर्ती पटेलच्या मैत्रिणीने टिकटॉक व्हिडीओ बनवत असताना भरवाड समाजाला उद्देशून चुकीचा शब्द उच्चारला होता, त्याला घेऊन भरवाड समाजातल्या काही तरुणांनी त्यावर आक्षेप घेतला. हा वाद दिवसेंदिवस वाढत चालला होता, त्यातच दोन टिकटॉक बनवणाऱ्या दोन गटांमध्ये चढाओढ तयार झाली.

यावेळी किर्ती पटेल आणि भरवाड समाजातील काही तरुणांकडून एकमेकांना मारहाणीच्या धमक्यादेखील येऊ लागल्या होत्या. हे प्रकरण कायमचं बंद करण्यासाठी अखेर किर्तीने दोन गटांमध्ये बैठक घेण्याचे ठरवले, त्यावेळी वाद निर्माण होऊन मारामारीला सुरूवात झाली. 

बैठकीत किर्ती पटेलच्या बाजून असलेल्या भरवाड समाजाचा तरुण कनू भरवाडे याने रघू भरवाडे याच्या डोक्यात गंभीर वार केला, याची तक्रार रघू भरवाडे आणि त्याच्या साथीदारांनी पुनागाम पोलिंसात नोंदवली, अखेर हत्येचा प्रयत्न आणि धमकावल्याच्या गुन्हात किर्ती पटेल आणि तिच्या साथीदारांना पुनागाम पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News