Tik Tokची मालकी आता अमेरिकन कंपनीकडे येणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 21 September 2020
  • टिकटॉक हा जगभरात लोकप्रिय अॅप आहे. भारतात टिकटॉक अॅप वर बंदी घालण्यात आली आहे.
  • कारण हा अॅप चीनचा असल्यामुळे भारताने त्यावर बंदी घातली आहे.
  • परंतु अमेरिकेची सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकला चीनची व्हिडियो शेयरिंग अॅप कंपनी बाइटडांसला विकत घेणार आहे.

वॉशिग्टंन :-  टिकटॉक हा जगभरात लोकप्रिय अॅप आहे. भारतात टिकटॉक अॅप वर बंदी घालण्यात आली आहे. कारण हा अॅप चीनचा असल्यामुळे भारताने त्यावर बंदी घातली आहे. परंतु अमेरिकेची सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकला चीनची व्हिडियो शेयरिंग अॅप कंपनी बाइटडांसला विकत घेणार आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराला मंजूरी दिली आहे. वॉलमार्टही या कराराचा एक भाग असेल अशी माहिती ही ट्रम्प यांनी दिली. टेक्सासमध्ये या कंपनीचे ऑफिस असणार असून टिकटॉकची मालकी त्यामुळे अमेरिकेकडे येणार आहे.

हे प्रकरण अमेरिकन कोर्टातही गेले होत. अमेरिका आणि चीनमध्ये संबंध बिघडल्यानंतर दोन्ही देशांमध्ये व्यापार युद्धाला सुरूवात झाली होती. अमेरिका चिनी मालांवर सूट देते, पण चीन अमेरिकन कंपन्यांना सवलती देत नाही असा अमेरिकेचा आरोप आहे.

चीनने WeChat आणि Tik Tok वर बंदी घालण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. या कंपन्यांची मालकी अमेरिकन कंपन्याकडे आली नाही तर त्यावर बंदी घातली जाईल असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. या अॅपमुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.

या कंपन्या वापरकर्त्यांचा डेटा चोरतात असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळेच भारतातही त्यावर बंदी घालण्यात आली आहे. जगभर या अॅपचा वापर केला जातो आणि त्या माध्यमातून या कंपन्यांची हजारो कोटींची कमाई होत असते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News