टायगर श्रॉफने उचललं 200 किलो वजन, व्हिडीओ व्हायरल

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Wednesday, 21 August 2019

बॉलिवुड स्टार्समधील फिटनेसच्या बाबतीत सतत चर्चेत असलेलं नाव म्हणजे टायगर श्रॉफ. नेहमीचं टायगर आपल्या दमदार अॅक्शन आणि फिटनेसने चाहत्यांचं मन जिंकत असतो. सोशल मीडियावर नेहमीचं वर्कआउट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

मुंबई : बॉलिवुड स्टार्समधील फिटनेसच्या बाबतीत सतत चर्चेत असलेलं नाव म्हणजे टायगर श्रॉफ. नेहमीचं टायगर आपल्या दमदार अॅक्शन आणि फिटनेसने चाहत्यांचं मन जिंकत असतो. सोशल मीडियावर नेहमीचं वर्कआउट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.  नुकताचं टायगरने वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

टायगरच्या  वर्कआऊट व्हिडीओंमध्ये त्याची मार्शल आर्ट, जिमनैस्टिक्स स्टंट पाहायला मिळत असतात. तसेचं त्याचे व्हिडीओ चाहत्यांना नेहमीचं प्रेरणा देणारे असतात. मात्र या व्हिडीओला पाहून सर्वचं आश्चर्य चकीत झाले आहेत. दरम्यान या व्हिडीओमध्ये टायगर 200 किलोचे वजन उचलताना दिसून येत आहे.

नुकताचं टायगर श्रॉफने वर्कआउट करतानाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो 'वेट लिफ्ट' करताना दिसून येतोय. या व्हिडीओला कमी वेळात एक लाखापेक्षा अधिक वेळा बघीतलं गेलयं. या व्हिडीओला कॅप्शन देत लिहलयं की, खुप वेळानंतर मी अश्या पध्दतीने वर्कआउट केलं आहे, 200 किलोग्राम. शाळेमध्ये असताना हे सर्व काही खुपचं सोप्पं वाटायचं. ऑनलाईन ह्यूमन'. 

याचसोबत बॉलिवूड सेलिब्रेटिंनी देखील स्तुती करताना दिसून येतायेत. कमेंट बॉक्समध्ये पाहिलात तर दिसून येत की, फिटनेस क्विन नावाने ओळखली जाणारी अॅक्टर म्हणजे शिल्पा शेट्टीने बाप रे! अशी कमेंट केली आहे. तर ईशान खट्टरने टायगला 'सुपर ह्यूमन' अशी कमेंट केली आहे. लवकरचं टायगर अॅक्शन वॉर चित्रपटामध्ये दिसून येणार आहे.    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News