टायगरला अधिकाधिक चित्रपटाची ऑफर!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 February 2020

बिग बजेट हिंदी चित्रपटांच्या ऑफर येत असताना ‘जुडवा ३’ चित्रपटासाठीही टायगरला विचारणा करण्यात आली आहे. वरुण धवन, सलमान खानला मागे टाकत टायगरच्या नावे हा चित्रपट झाला आहे.

ॲक्‍शनपट चित्रपट करण्यात सरस असणारा टायगर श्रॉफ अल्पावधीत तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला. त्याच्या चित्रपटांनी बॉक्‍स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. सध्याच्या ट्रेंडिंग हिरोंच्या यादीत टायगर आघाडीवर आहे. खरं तर टायगर ‘सबसे आगे’ आहे, असेच म्हणावे लागेल.

त्याचे कारणही अगदी तसेच आहे. बिग बजेट हिंदी चित्रपटांच्या ऑफर येत असताना ‘जुडवा ३’ चित्रपटासाठीही टायगरला विचारणा करण्यात आली आहे. वरुण धवन, सलमान खानला मागे टाकत टायगरच्या नावे हा चित्रपट झाला आहे.

या चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आता दिग्दर्शक डेविड धवनने तिसऱ्या भागासाठी टायगरला पसंती दिली आहे. आता ‘जुडवा ३’मध्ये टायगर असणार म्हणजे ॲक्‍शनही असणार, एवढे मात्र नक्की.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News