शाळेत असल्यापासूनच टायगरला आवडते 'ही' अभिनेत्री 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 1 March 2020

एवढंच नाही तर शाळेत असल्यापासून त्याला ही अभिनेत्री आवडत असल्याचं देखील टायगरने कबुल केलं. ही अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर..! 

अभिनेता टायगर श्रॉफ याचा बागी ३ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील दिसणार आहे. सध्या ते दोघेही 'बागी ३' च्या प्रमोशनमध्ये आहे. यासोबतच दिशा पाटनीसोबत असलेल्या नात्याबाबत देखील तो चर्चेत असतो. मात्र त्यांच्यातील नातं अजून त्या दोघांनीही मान्य केलं नाहीये.  मात्र बागी ३ च्या प्रमोशनदरम्यान टायगरने एक खुलासा केला आहे. ज्यामुळे सर्वानाच आश्चर्य वाटेल. 

टायगरला एका मुलाखतीमध्ये त्याच्या क्रश बद्दल विचारण्यात आले होते. त्यावेळी त्याने बॉलिवूडमधी एका प्रसिद्ध अभिनेत्रीच नाव घेतलं. एवढंच नाही तर शाळेत असल्यापासून त्याला ही अभिनेत्री आवडत असल्याचं देखील टायगरने कबुल केलं. ही अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर..! 

 

टायगरने यावेळी सांगितलं की, शाळेत असताना मला श्रद्धा आवडत होती, मात्र त्यावेळी माझाकडे तिला समोरून सांगायची हिंमत नव्हती. त्यामुळे श्रद्धाला ही गोष्ट कधी कळलीच नाही. आता श्रद्धा त्याच्यासोबत काम करत असल्याचा आनंद असल्याचं देखील त्याने यावेळी सांगितलं. 

यापूर्वी देखील वरून धवनने आपल्याला कॉलेजमध्ये असताना श्रद्धा आवडत असल्याचे सांगितले होते. मात्र त्यालाही त्यावेळी आपल्या भावना व्यक्त करता आल्या नसल्याचे त्याने सांगितले. या दोघांसोबतही श्रद्धाने काम केले आहे. प्रेक्षकांना या दोघांची जोडी आवडली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News