मौजमजेसाठी या टिकटॉक स्टारने चोरल्या गाड्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 August 2020

खडकी, सांगवी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे पोलिस हद्दीत राहूल वेगवेगळ्या दुचाकी वापरत असल्याची पोलिसांनी खबर मिळाली होती.

मौजमजेसाठी या टिकटॉक स्टारने चोरल्या गाड्या

पुणे - आजचा तरूण आरामदायी आणि मौजमेजेचे आयुष्य कसे जगता करता येईल, यासाठी वेगवेगळ्या आयडिया वापरत असतो. पण पुण्यात एका टिकटॉक स्टारने मौजमजेसाठी चार लाख रूपयांच्या १० दुचाकी चोरल्याचे प्रकरण पुण्यातील पोलिसांनी उघडकीस आणले आहे. हे काम टिकटॉक स्टारनं मित्रालासोबत घेऊन केले आहे.

टिकटॉक स्टारचं नाव राहूल मोहन पवार आणि त्याचा मित्र स्वप्नील राजू काटकर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांकडून पोलिसांनी १० दुचाकी हस्तगत केल्या आहेत. हे दोघे मिळून खडकी, सांगवी आणि भोसरी एमआयडी परिसरात दुचाकी चोरण्याचं काम करीत होते. दिवसभर फिरून झाल्यानंतर दोघेही चोरलेली गाडी भोसरी पुलाखाली उभी करीत असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली.

राहूल आणि त्याचा मित्र स्वप्नील भोसरी येथील मुख्य पुलाखाली दुचाकी घेऊन थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी परिसरात सापळा लावण्यास सुरूवात केली. सापळा लावून झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांची अधिक चौकशी केली असता दहा दुचाकी चोरल्याची कबुली दोघांनी दिली.

खडकी, सांगवी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे पोलिस हद्दीत राहूल वेगवेगळ्या दुचाकी वापरत असल्याची पोलिसांनी खबर मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News