ट्रम्प विरोधात टिकटॉकने दंड थोपटले; कायदेशीर मार्ग अवलंबणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 August 2020

अमेरिकेच्या निर्णया विरोधात टिकटॉकने दंड थोपटले आणि अमेरिकन प्रशासनाला न्यायालयामध्ये घेऊन जाण्यासाठी कंबर कसली आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक वर बंदी घालण्याचे आदेश 7 ऑगस्ट 2020 रोजी दिले. आणि 45 दिवसाच्या आत टिकटॉकला अमेरिकेतून आपला गाशा गुंडाळायला सांगितला. 15 सप्टेंबरला 45 दिवस पुर्ण होणार आहेत. त्यामुळे अमेरिकी प्रशासनाच्या निर्णयावर टिकटॉकची मुळ कंपनी बाईटडान्स कायदेशीर मार्ग अवलंबणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे अमेरिका आणि चीन यांचे संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत.

टिकटॉक अमेरिकेतील जनतेची माहिती चीन सरकारला पुरवत आहे, त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे टिकटॉकने अमेरिकेतील व्यावसाय विकून टाकावा असा आदेश टम्प प्रशासनाने बाईटडान्सला दिला. 'वर्षभरापासून आम्ही अमेरिकेला टिकटॉकची कार्यप्रणाली आणि गुप्तता सांगत आहोत. अनेक  तरी देखील अमेरिकन प्रशासन मानायला तयार नाही त्यामुळे शेवटी आम्ही कायद्याचा मार्ग अवलंबणार आहोत' असे बाईटडान्सने सांगितले. अमेरिकेच्या निर्णया विरोधात टिकटॉकने दंड थोपटले आणि अमेरिकन प्रशासनाला न्यायालयामध्ये घेऊन जाण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे आता अमेरिका आणि चीन या दोन या देशांमध्ये व्यवसायावरून वाक्युद्ध सुरू झाले.

अमेरिकेमध्ये 8 कोटी जनता टिकटॉकचा वापर करतात, टिकटॉक बंद झाल्यास खूप मोठा कोटा बाईटडान्स कंपनीला होणार आहे. आता न्यायालय अमेरिकेच्या निर्णयावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतानेही काही दिवसापूर्वी चीनचे अनेक ॲप सरकारने बंद केले. टिकटॉक ही मनोरंजन क्षेत्रातील मोठी कंपनी आहे जगभरातील करोडो युजर्स टिकटॉकचा वापर करतात, त्यातून कंपनीला मोठा फायदा होतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News