टिकटॉकने भारतातले १.६५ कोटी व्हिडिओ हटवले 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 July 2020

भारतात टिकटॉक बंद झाल्यानंतर टिकटॉकने भारतातील १.६५ कोटी व्हिडिओज हटवले आहेत, याची माहिती टिकटॉकने केंद्र सरकारला दिली आहे. 

टिकटॉकने भारतातले १.६५ कोटी व्हिडिओ हटवले 

नवी दिल्ली - भारत आणि चीनचा सीमेवर झालेला संघर्ष इतका टोकाला गेला की, भारतात सुरू असलेले चीनचे ५९ अॅप भारत सरकारने बंद केले. त्यामध्ये टिकटॉक नावाचं फेमस अॅप सुध्दा बंद करण्यात आलं, त्यामुळे भारतातल्या तरूणाईला मोठा फटका बसला आहे. अॅक्टिव्ह युजर्स पासून ते डाऊनलोड्स आणि रिविन्यू मध्येही टिकटॉक भारतात एक नंबरला होते. भारतात टिकटॉक बंद झाल्यानंतर टिकटॉकने भारतातील १.६५ कोटी व्हिडिओज हटवले आहेत, याची माहिती टिकटॉकने केंद्र सरकारला दिली आहे. 

टिकटॉकच्या माहितीनुसार, भारतातील युझर्सचे टिकटॉकने  १.६५ कोटी व्हिडिओज हटवले गेले आहेत. तसेच ही संख्या देशाच्या तुलनेच चारपट पेक्षा अधिक आहे. भारतासह पाकिस्तानमधील ३७ लाख व्हिडिओ टिकटॉकने हटवले आहेत. पाकिस्तान हा देश टिकटॉकमध्ये तिस-या क्रमांकावर आहे. 

टिकटॉककडून हटवण्यात आलेल्या व्हिडिओ २०१९ मधील आहेत. हे व्हिडिओ हटवण्याचे मुख्य कारण म्हणजे अडल्ट न्यूडिटी आणि सेक्सुअल अॅक्टिविटी व्हिडिओज मध्ये दिसत होते. तसेच यामध्ये अल्कहोल, ड्रग इत्यादी व्हिडिओचा समावेश होता. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News