टिकटॉकला पर्याय अॅप भारतात लॉंच 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 July 2020

टिकटॉकवरती बंदी झाल्यापासून अनेक अन्य अॅप्स लोकप्रिय ठरत आहेत. त्यामुळे इंस्टाग्रामच्या रील्स फीचरलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

टिकटॉकला पर्याय अॅप भारतात लॉंच 

टिकटॉक अॅप भारतात बंद केल्यापासून अनेक तरूण-तरूणी नाराज असल्याचं पाहायला मिळतं होतं. परंतु त्यांची ही नाराजी अधिक काळ राहणार नाही, कारण आता टिकटॉक सारखं सेम अॅप इंस्टाग्रामने लॉंच केलं आहे. त्यामुळे पुन्हा तरूणाईमध्ये उत्साह पसरला आहे. हे अॅप डाउनलोड सुध्दा करण्यात भारतातली तरूणाई अग्रेसर असल्याचं म्हणटलं जातं आहे. 

https://lh3.googleusercontent.com/Or4wqavOITaWivLqgjw2sPNPcZYH_tQKvrFXrWB5OF-6mnZAQ4jtb3OMf0Yfy7huLghgjtOoRzA_3jdBA8ry73PFU2fHa2UxsT6_Kg_TDzHl3CjuiZfzh2pghwGNx_VMo4Y2qE-Y0mI-KCM2jT2vcC1u53Fl5J5toAIJMJY2gY1Qr2cwy_qoMr0qHbadY09Im4ZKyDD14gOx7SpZZotJsFg83z5pJwGzXeBSr3DXaVCS89xfGwzOCNHUOB3xeih1nIv_8qEHILe98OICm5Ocn6eSQLD1QOHylfUA_PIhBqWPgqpsxH0ey76Jl3WvzEllaScd9lREv1q-C4JT0kosU-q2sulaC-RVdm9_xIVjQbFDQiw_vh64h4HPRQxQcvHJkzpHQbJorNmPqpCzUsc4_X0wgqrmv-oEVf4xiQdjgdIlCAf9RgUGtpCPY94o4T-hbTIEsZC5CC6Tk5q4TJWK2p4rntAMS8U5SYrmILjJUAFhqidnHDH3xkBXwB-yrk59Mb8hXsr75RTsPsR8xJ0wf75V5BdKgEkPDd9KKCnEFap3w9RxHGkPwhbPaYLe89QV3fZuYpZZ21NuRAMRRz4Vme6Q6CTDYQlXlpDr7fYVezdhKRKxhEvps0ujkng7RUQzRn1RUIvQfIgzsYNuaHkNQYI_h6NLdR9JzSIkejyPMu3zGMIzaIyTx5R00Y1Z=w379-h252-no?authuser=0

या अॅपचं नाव रील्स असं असून त्यामध्ये टिकटॉक सारखे फिचर्स सुध्दा आहेत. या अॅपमध्ये तुम्ही व्हिडीओ सुध्दा बनवू शकता. क्रिएटिव्ह फिल्टर आणि म्युजिक तुम्ही टिकटॉकप्रमाणे शेअर करू शकता. तसेच १५ सेकंदा एवढा व्हिडीओ या अॅपमध्ये तयार करता येईल. 

रील्स अॅपमध्ये म्युजिक लाइब्रेरीमधून ऑडियो, स्पीड, इफेक्टस आणि टाइमरचे ऑप्शन उपलब्ध आहेत. तसेच टिकटॉकप्रमाणे व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये बदल होतो, तसेच व्हिडिओचा स्पीडही कंट्रोल करता येतो. रिल्स अॅपमध्ये समजा तुम्ही एखादी स्टोरी केली, तर ती स्टोरी इंस्टाग्रामला शेअर करू शकता. त्यामुळे तुम्हाला इतर कोणत अॅप घेण्याची गरज नाही. 

 

इतर देशांमध्ये हे फीचर कित्येक वर्षापासून उपलब्ध होतं. आता त्या कंपनीने हे फीचर भारतीय युजर्ससाठीही भारतात लॉंच केलं आहे. भारतात टिकटॉकवरती बंदी झाल्यापासून अनेक अन्य अॅप्स लोकप्रिय ठरत आहेत. त्यामुळे इंस्टाग्रामच्या रील्स फीचरलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News