पिंक बॉल टेस्टचा सामना होणार हाऊस फुल्ल - सौरव गांगुली

यिनबझ टीम
Wednesday, 20 November 2019

कोलकाता - बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीच्या मते, कोलकाता येथे बांगलादेश विरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीच्या पहिल्या चार दिवसांची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. 22 नोव्हेंबरपासून भारत बांगलादेशविरूद्ध पहिला डे-नाईट टेस्ट खेळणार आहे आणि त्यासाठी दोन्ही संघ कोलकाता येथे पोहोचले आहेत.

गांगुलीने यापूर्वीही या स्पर्धेचा अधिकृत उद्घाटनावेळी 'पिंकू-टिंकू' चे अनावरण केले होते. कोलकातामधील ईडन गार्डन हे भारतातील सर्वात मोठ्या स्टेडियमपैकी एक स्टेडियम आहे त्याची प्रेक्षकांची क्षमता 67000 इतकी आहे.

शुक्रवारपासून बांगलादेश विरुद्ध कोलकाता येथे होणाऱ्या ऐतिहासिक डे-नाईट टेस्ट मॅचसाठी भारतीय क्रिकेट संघ मंगळवारी कोलकाता येथे पोहोचला. बीसीसीआयने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत ती माहिती दिली. ज्यात संघाचे खेळाडू आणि प्रशिक्षक खूप उत्साही दिसत आहेत.

दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघाने इंदौर येथे पहिली कसोटी डाव आणि 130 धावांनी जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News