अ‍ॅक्शनचा थरार; 'बागी-३' चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 February 2020

मुंबई: 'हिरोपंती' चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारा अभिनेता टायगर श्रॉफ आज बॉलीवूडचा 'अ‍ॅक्शन  स्टार' म्हणून ओळखला जातो. टायगर श्रॉफ त्याच्या डान्स आणि स्टंटमळे जगप्रसिद्ध झाला आहे. अगदी कमी वेळेत त्याने कलाविश्वात आपलं स्वतःच स्थान निर्माण केलं असून त्याने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.  'बागी -२' च्या यशानंतर आता लवकरच 'बागी-३' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची शूटिंग अनेक दिवसांपासून सुरु असून या चित्रपटातील बहुतेक सिन हे परदेशात चित्रित केले आहेत.

काही दिवसांपूर्वीच 'बागी-३' या चित्रपटाचा पोस्टर रिलीझ झाला होता. या पोस्टरमध्ये टायगर श्रॉफ अ‍ॅक्शन अवतारात दिसून आला त्यामुळे  या चित्रपटात भरपूर ऍक्शन सिन पाहायला मिळणार हे नक्की . परंतु टायगर श्रॉफ या चित्रपटात नक्की  कोणत्या भूमिकेत आणि कशा प्रकारे स्टंट करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. ही उत्सुकता आता संपली आहे. कारण 'बागी-३' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटामध्ये टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या आधीही 'बागी-२' मध्ये टायगर आणि श्रद्धा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसून आले. परंतु 'बागी-३' मध्ये  या दोघांबरोबरच अभिनेता रितेश देशमुख एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  चित्रपटाचा ट्रेलर अधिक रोमांचकारी असून त्यामध्ये थरारक अ‍ॅक्शन सिन पाहायला मिळत आहे.पोस्टर प्रमाणेच 'बागी-३' चा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार यात काही शंका नाही. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News