खर्डी महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने तीन दिवशीय स्पर्धेचे आयोजन

दिव्येश जाधव 
Friday, 24 January 2020
  • जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाच्या वतीने तीन दिवशीय वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन केले होते.

खर्डी :  जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाच्या वतीने तीन दिवशीय वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. दि. २२ ते २४ जानेवारी २०२० या दिवशी स्पर्धेचे आयोजन केले होते.

विद्यार्थ्यांना पुढे येऊन बोलीण्याची सवय झाली पाहिजे. म्हूणन त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयावर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली.त्या स्पर्धेत विजेत्याना १ व २ क्रमांक काढण्यात आले.पहिला क्रमांक तेजस निमसे आणि दुसरा क्रमांक नीता सदगीर याना देण्यात आला. या दोघांनाही आपली भूमिका अतिशय उत्तम प्रकारे मांडली होती. 

निबंधस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये माधुरी डोंगरे यांनी पहिला क्रमांक पटकावला तर हर्षदा भेरे हिने दुसरा क्रमांक पटकावला आणि संदेश भोईर यांनी तिसरा क्रमांक पटकावला. आणि आपल्या लिखाण कौशल्यातून आपली मते मांडली. 

तसेच दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनच्या कलागुणांना वाव मिळावा म्हूणन पोर्स्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना विषय दिले होते.त्यावरून पोर्स्टर काढायचे होते उदा. आधुनिक भारत, पैसे विरहित पेमेन्ट, अश्या अनेक विषया वर विद्यार्थ्यांनी पोर्स्टर बनवले. आकाश भाकरे याने पहिला क्रमांक पटवकावला तर दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला नूतन तळपडे आणि तिसरा क्रमांक पुनम केने यांनी पटकावला. आणि स्वतःमधील कला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सादर केली. याचबरोबर महाविद्यालयात वादविवाद स्पर्धेचंही आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. 

GST आणि CCTv अशा अनेक विषयांवर विद्यार्थ्यांनी आली मते योग्य रीतीने मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच तिसऱ्या दिवशी वाणिज्य शाखेचे प्रदर्शन भरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी एक देखावा बनून आणला होता. त्याची माहिती प्रशिक्षकांना दिली आणि त्यांना काही प्रश्न कॉलेजच्या प्रा. कैलास कळकटे सरांनी विचारले आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शनही केले व या स्पर्धेत आकाश पानसरे याने पहिला क्रमांक पटकावला मयुरी पवार या विध्यार्थींनीने दुसरा क्रमांक मिळविला तर हर्षदा भेरे याला तिसरा क्रमांक देण्यात आला. बाकीच्या गटांनीही अतिशय सुंदर पद्धतीने आपला देखावा व त्याचीं माहिती दिली. या कार्यक्रमाचे आयोजन वाणिज्य शाखेचे प्रा.अपर्णा जाधव, प्रा.पांढरे सर, प्रा. कंठे मॅडम आणि प्रा. खानसर आणि उपस्थित वाणिज्य शाखेचे विद्यार्थ्यांनी केले होते. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News