काश्मीरच्या संचारबंदीमुळे हजारो तरुणांच्या लग्नाचे वाटोळे झाले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 September 2019

जम्मू आणि कश्मीर - जम्मू आणि कश्मीरमध्ये जुलै ते डिसेंबर या महिन्यांचा कालावधी म्हणजेच लग्नाचा हंगाम समजला जातो. अनेक छोटे-मोठे समारंभही या कालावधीत केले जातात, मात्र गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये कोणतेही सण उत्सवसुध्दा साजरे करताना तेथील नागरिकांना हजारो समस्यांना सामोरे जावं लागत आहे.

गेले काही दिवस काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यापासून संचारबंदी लागू केली आहे, त्यामुळे तेथे या मोसमात होणारे लाखो तरुण तरुणींची लग्न समारंभ पुढे ढकलले आहेत तर कांहीचे लग्न रद्द झाले. 

काहींनी आपल्या लग्नाची तयारी केली होती, तर लग्न समारंभासाठी लागणारे साहित्यदेखील काही कुटुंबानी खरदी करून आणले होते, मात्र त्या सर्व खर्चावर त्यांना पाणी फेरावं लागलं. 

तेथे झालेल्या बंद बाजारपेठांमुळे घरगुती साहित्यही तेथील नागरिकांना मिळेनासे झाले आहे. लग्न समारंभासाठी एकत्र जमलेल्या पाहुण्यांचा खर्चही काही कुटुंबांना झेपत नाही, त्यामुळे कलम 370च्या कारणाने  काश्मीरमध्ये लागलेल्या संचारबंदीमुळे हजारो तरुणांच्या लग्नाचे वाटोळे झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News