ज्यांना कबीर सिंग आवडला, त्यांनी थप्पड जरूर पाहावा, सोबतच संदीप रेड्डींनीही...

यिनबझ टीम
Sunday, 2 February 2020

जगाच्या दृष्टीने साधी असलेली गोष्ट तापसीसाठी साधी नसते, हे या ट्रेलरमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नवऱ्याने थप्पड मारल्यानंतर तिने आपले लग्न संपविण्याचा निर्णय घेतला.

तापसी पन्नूचा  चित्रपट ‘थप्पड’ चा ट्रेलर सध्याच रिलिज झाला. ट्रेलरची सुरुवात हिंदू  मॅरेज कायद्याच्या ‘सेक्शन 9’ पासून झाल्याचे दिसून येते. एक महिला किंवा पुरूष विना कुठल्या पुराव्याचे एखादं लग्न मोडू शकतात. तापसीदेखील याच अधारावर आपला संसार मोडण्याचा प्रयत्न करत असते. त्यासाठी एकच कारण होते, ते म्हणजे तिचा पती पार्टीमध्ये तिला एक थप्पड मारतो. ट्रेलरमध्ये हेही दाखवले आहे की ज्यावेळी तापसीच्या वकिलांना काडीमोड घेण्याचं कारण समजते त्यावेळेस वकीलदेखील हैरान होतात.

 

जगाच्या दृष्टीने साधी असलेली गोष्ट तापसीसाठी साधी नसते, हे यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. थप्पड मारल्यानंतर तिने आपले लग्न संपविण्याचा निर्णय घेतला. यावर तिच्या पतीला, पतीच्या आणि आपल्या पालकांना सोबतच आपल्या वकीलांनादेखील समजावून सांगण्याची वेळ तापसीवर येते, त्यावेळेस तापसी म्हणते की त्या एका थप्पडमुळे, मी त्या सर्व गोष्टी पाहू शकले, ज्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष करून पुढे जात होती.

या ट्रेलरमुळे काहींना एका वर्षापूर्वी आलेल्या कबिर सिंगची आठवण झाली, कबिर सिंग सोबतच 'अर्जुन रेड्डी' (2017) आणि 'आदित्य वर्मा' (2019) हेदेखील चित्रपट प्रेषकांनी चांगलेच उचलून धरले होते. या तिन्ही चित्रपटांमध्ये हिरोंचे हिरोईनवर वर्चस्व आहे. त्यांचा छळ करणे, त्यांना धमकी देणे, त्यातच म्हणजे त्यांना थप्पड मारणे इतपर्यंत कॉंट्रोवर्सीच्या भरोशावर मसाला या तिन चित्रपटांमध्ये भरला आहे. 

ज्यावेळेस या चित्रपटाचे दिग्दर्षक अर्जून रेड्डी यांनी एक मुलाखत दिली होती, त्यावेळे त्यांनी प्रेम करणाऱ्या तरुण आणि तरुणींमधल्या संबधावर भाष्य केले होते, त्यांच्या मते प्रेम करणारे लोक एकमेकांशी खूप कनेक्टेड असतात. जर त्यांच्याकडे एकमेकांना स्पर्श करण्याचा, थप्पड मारण्याचा, रागवण्याचा, किस करण्याचा अधिकार नसेल तर त्यात कोणत्याच फिलिंग दिसून येत नाहीत, अशा प्रकारचं मत रेड्डी यांनी त्या मुलाखतीत मांडलं होतं.

रेड्डी चित्रपटाचा नायक विजय देवरकोंडा यालादेखील अशाच चित्रपटातल्या थप्पडबद्दल विचारण्यात आलं होतं, त्यावेळे त्यानेही दिग्दर्शकासारखेच उत्तर दिले होते. त्याच्या मते काही चित्रपट हे समाज सुधारण्यासाठी बनवले जात नाहीत, तर ते नात्यातले प्रेम दाखवण्यासाठी तयार केले जातात, अशातच थप्पड चित्रपटाने या दोघांना किंवा  या दोघांच्या मताशी सहमत असलेल्या अनेकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. 

थप्पडमध्ये प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक कायदा क्रमांक 2005 (Protection of Women from Domestic Violence Act 2005) नुसार महिलांचे कौटुंबिक शोषण, शाब्दिक किंवा भावनिक हिंसा, आर्थिक हिंसा, लैंगिक शोषण करणे कायद्याने गुन्हा आहे. कबिर सिंग सारख्या अनेक चित्रपटांमध्ये प्रेम व्यक्त करण्याच्या बहान्याने महिलांवर आवाज उठवणे, हात उगारण्याचे प्रकार दाखवण्यात आले आहेत, मात्र हे कायद्याने गुन्हा असल्याचे थप्पड हा सिनेमा सांगून जातो. त्यामुळे कबिंर सिंग, अर्जून रेड्डी चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी यांनी हा सिनेमा नक्की बघावा, अशाप्रकारची मते सोशल मिडीयावर व्हायरल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News