'त्या' विद्यार्थ्यांनी केलं सिंहगडाला प्लॅस्टिकमुक्त

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

विद्यापीठ राबविणार गडसंवर्धन मोहीम
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील सर्व गडांवर गडसंवर्धन उपक्रम राबविणार आहे. प्रत्येक गडावर स्वच्छता अभियान राबविणार आहे. याची सुरुवात सिंहगडापासून करण्यात आली. स्वच्छता ही स्वतःचे व समाजाचे स्वास्थ्य टिकविण्यासाठी महत्त्वाची आहे.’’

पुणे : संत गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या तेराशे स्वयंसेवकांनी सुमारे सव्वाशेहून अधिक बॅगमध्ये प्लॅस्टिकचा कचरा जमा करीत रविवारी सिंहगडावर स्वच्छता मोहीम राबविली.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत पुणे शहरातील विविध महाविद्यालयांमधील सुमारे १ हजार ३६५ विद्यार्थी यात सहभागी झाले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून सव्वाशेहून अधिक पिशव्यांमध्ये कचरा जमा झाला. या उपक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. संजय परचुरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, सांगवी येथील बा. रा. घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, सहायक उपवनसंरक्षक अजय कडू, जिल्हा, विभाग समन्वयक, कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते.

याप्रसंगी शाहीर हेमंत मावळे यांनी नरवीर तान्हाजी मालुसरे यांचा पोवाडा सादर केला. उमराणी यांनी ‘‘छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा घेऊन जीवन जगल्यावर राज्यात, देशात सकारात्मक बदल घडतील,’’ असे सांगितले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News