त्या ९ विद्यार्थ्यांना मिळणार पैसे वापस...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020

9 विद्यार्थ्यांना शुल्क परत मिळणार. सीईटीचे दोन अर्ज भरणाऱ्यांना दिलासा. 

मुंबई : प्रवेश व शुल्क कायद्यांतर्गत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) यापूर्वी घेतलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे अर्ज भरताना तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना त्रास झाला. वर्ष वाया जाऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांनी दोन वेळा अर्ज भरले. या सर्व विद्यार्थ्यांना शुल्क परत देण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (ता. २०) दिले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी प्रवेश नियामक प्राधिकरण आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे आयोजित आढावा बैठकीत हे निर्देश दिले. यापूर्वी घेण्यात आलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेवेळी (सीईटी) विद्यार्थ्यांकडून चुकीचे अर्ज भरले गेले. तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांकडून दोन वेळा शुल्क घेण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना शुल्क परत करण्याचे निर्देश सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठीची सीईटी विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालये यांच्यासाठी सुलभ व्हावी आणि प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी एक समिती नेमण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन सर्व शैक्षणिक धोरणे ठरवावीत, अशी सुचनाही सामंत यांनी केली. # विभागनिहाय शैक्षणिक संवाद विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्येक विभागात शैक्षणिक संवाद कार्यक्रम होईल. विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर याची सुरुवात होईल, असे सामंत यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News