दुष्काळात तेरावा महिना; येथे पाण्याचा टॅंकर पाहून ठरवला जातो लग्नाचा मुहूर्त

सुरज पाटील (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

देशात दुष्काळाचे इतके भयान वास्तव निर्माण झाले आहे, की अंघोळ, धुनी-भांडी तर सोडाच; पण लोकांना जेवन बनवण्यासाठीदेखील पाणी मिळणे मुश्किल झाले आहे...

देशात दुष्काळाचे इतके भयान वास्तव निर्माण झाले आहे, की अंघोळ, धुनी-भांडी तर सोडाच; पण लोकांना जेवन बनवण्यासाठीदेखील पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. महाराष्ट्र, गुजरात, काही प्रमाणात उत्तरप्रदेश आणि अशाप्रकारे छोट्या-मोठ्याप्रमाणात प्रत्येक राज्यामध्ये दुष्काळाच्या झळा बसत आहेतच. त्यातच भर म्हणजे लग्नाची घाईगडबड. अशाच एका राज्यातील दुष्काळी भागात लग्नाचा मुहूर्त ठरवायचा असेल तर आधी लग्नासाठी लागणाऱ्या पाण्याच्या टॅंकरची सुविधा करावी लागते. वाचा नेमकी काय आहे खबर... 

हे राज्य आहे, गुजरात. पाकिस्तानच्या सिमेपासून फक्त 40 किमी अंतरावर असलेल्या भाखरी गावात हे भयंकर आणि विचित्र चित्र पाहायला मिळत आहे. येथे असलेला एकमेव तलाव इतिहासात पहिली वेळ आटल्याने तेथे जीवन साखळी विस्कटलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या गावाासून 25 किमी लांब असलेल्या गावातून पाण्याचा टॅंकर मागवण्याची वेळ भाखरीच्या गावकऱ्यांवर आली आहे, मात्र परिस्थिती खराब की ज्या ठिकाणाहून पाण्याचे टँकर मागवले जातात, त्या ठिकाणी २ दिवस आधी आपलं नाव नोंदवावं लागतं.

वरील परिस्थितीमुळे लग्न तसेच इतर कार्यक्रमांचे नियोजन ठरवण्याआधी तेथील नागरिकांना पाण्याच्या टँकरची नोंदणी करावी लागते, तर काही प्रमाणात पाण्याचा टँकर स्वस्त मिळतो म्हणून तेथे लग्नाचा हंगाम झाल्यानंतर लग्नाचे मुहूर्त शोधले जातात.

जनावरांचे पाणी पिऊन झाल्यानंतर तिथले नागरिक ते पाणी पितात...
गेले कित्येक वर्षे त्या ठिकाणी दुष्काळाचे इतके गंभीर वातावरण आहे, तिथल्या नागरिकांमधून तसेच त्यांच्या संस्कृतीमधून देखील तो दुष्काळ दिसून येतो. दुष्काळाची कोणतीही झळ तेथील जनावरांना भासू नये म्हणून जनावरांना त्या गावापासून काही अंतरावर लांब ठेवण्यात आले आहे. तर जनावरांना पाजवण्यात आलेलं पाणी फेकून न देता, तेच पाणी तेथील नागरिक पितात. त्यामुळे पाण्याची बचत होते. मात्र त्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रणाण त्याठिकाणी मोठे आहे...

 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News