तृतीयपंथी ते राजकारण

महेश घोलप
Sunday, 20 September 2020

प्रिया संघर्षमय आयुष्य जगलेली आहे. कारण प्रत्येक तृतीयपंथीच्या वाटेला ज्या पद्धतीनं संघर्षाचं आयुष्य असतं, त्यापेक्षा वेगळं आयुष्य प्रियाच्या वाट्याला आलं. शरीरात होणारे बदल आणि बाहेरचं जग माहीत नसलेल्या एखाद्या इसमाला जसं जग नवीन वाटतं, तसं त्या वेळी प्रियाला वाटतं होतं. वयाच्या १६ व्या वर्षी आईनं घरातून हाकलून दिलं. कोणत्याही नातेवाइकानं दखल घेतली नाही. आयुष्याचा पाढा वाचत-वाचत शिक्षण पूर्ण केलं आणि तृतीयपंथीयांच्या न्यायासाठी आणि सामान्य जनतेसाठी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला

प्रिया संघर्षमय आयुष्य जगलेली आहे. कारण प्रत्येक तृतीयपंथीच्या वाटेला ज्या पद्धतीनं संघर्षाचं आयुष्य असतं, त्यापेक्षा वेगळं आयुष्य प्रियाच्या वाट्याला आलं. शरीरात होणारे बदल आणि बाहेरचं जग माहीत नसलेल्या एखाद्या इसमाला जसं जग नवीन वाटतं, तसं त्या वेळी प्रियाला वाटतं होतं. वयाच्या १६ व्या वर्षी आईनं घरातून हाकलून दिलं. कोणत्याही नातेवाइकानं दखल घेतली नाही. आयुष्याचा पाढा वाचत-वाचत शिक्षण पूर्ण केलं आणि तृतीयपंथीयांच्या न्यायासाठी आणि सामान्य जनतेसाठी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला प्रिया पाटील यांनी घेतला.

नाव प्रिया पाटील. जन्म मुंबईतल्या विरार येथे झाला. कुटुंबात एकटा असल्यानं आई-वडिलांच्या लाडात वाढत होता. आई-बाबांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये भरती केलं. शाळेत असताना बोलायची आवड होती. त्यामुळे भाषण उत्तम करायचा. शाळेत असताना शरीरात होणारे बदल जाणवायचे. तेव्हा मुलं शाळेत असल्यापासून मला चिडवायची; पण जास्त मनावर घेतलं नाही. प्रिया नऊ वर्षांची असताना बाबा न सांगता घर सोडून निघून गेले. त्यानंतर आईनं घरात लघुउद्योग करत माझा सांभाळ केला. शाळेतले मित्र अजूनही माझ्या संपर्कात आहेत, खूप चांगल्या घरातले होते. त्यामुळे आजही ते पहिल्यापेक्षा अधिक प्रेम करतात असं प्रिया पाटील यांनी सांगितले.

शरीरात होणारे बदल जाणवत होते; पण नेमकं काय आहे हे माहीत नव्हतं. कारण तेव्हा याबाबत माहिती सांगणारंही कोण नव्हतं. एकटी-एकटी राहायची, शांत बसायची. घरातून पळून आत्याकडे राहायला जायची. त्यांना सांगायची की मला बाबांकडे राहायला जायचं आहे, त्यांना भेटायचं आहे. ही सगळी कारणं ऐकून आई प्रियाची आई वैतागली होती.

10 वीची परीक्षा संपली आणि आईनं प्रियाला बाबांकडे औरंगाबादला 2 महिने राहायला पाठवलं. दोन महिने राहून झाल्यानंतर दहावीचा निकाल लागला आणि पुन्हा कॉलेजसाठी प्रिया मुंबईत आली. आईनं 11 वीला प्रवेश घेऊन दिला. शरीरात होणाऱ्या बदलानं प्रिया हैराण झाली होती. कोणाला सांगायचं आणि काय सांगायचं, असा प्रश्न प्रियाला वारंवार पडायचा.

वसईला राहणाऱ्या एका किन्नरसोबत प्रियाची मैत्री झाली. तिला भेटायला आणि तिच्याशी बोलायला प्रियाला आवडायचं. कॉलेजला एक महिना प्रिया गेलेच नाही.
एक महिन्यानंतर जेव्हा कॉलेजमधून प्रगती पुस्तक मिळालं, तेव्हा त्यामध्ये प्रियाला एटीकेटी लागली होती. घरी मार वाचवायला प्रियाने प्रगती पुस्तकात खाडाखोडही केली होती. जेव्हा घरी माहीत पडलं की कॉलेजला येत नाही, मी एका किन्नरसोबत राहतेय तेव्हा घरच्यांनी प्रियाला मारहाण करून 2001 मध्ये घरातून बाहेर काढलं.

इमारतीच्या जिन्यावर बसून प्रियाने पाच दिवस काढले, रात्री टेरेसवर झोपून राहावे लागले. जेव्हा आईला कळलं की प्रिया आजूबाजूला घुटमळतेय, तेव्हा आईनं झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आणि त्याला इथून जायला सांगा नाही तर मी कायतरी करून घेईन, असं मामाकडे सांगितलं.

मग प्रियाने बाबांकडे जाण्याचा निर्णय घेतला. बाबा औरंगाबादला नोकरी करत होते, हे तिला माहीत होतं. सकाळी लवकर उठून सीएसटी स्थानक गाठलं. औरंगाबादला जाणारी देवगिरी एक्स्प्रेस पकडली. जवळ काहीच पैसे नसल्याने विनातिकीट गाडीतुन प्रवास सुरु केला. रात्रभर गाडीत तिकीट चेकर आल्यानंतर इकडून-तिकडे आणि तिकडून-इकडे असा प्रवास प्रियाने केला.

औरंगाबादला जिथे प्रिया उतरली. तिथून बाबांचं कार्यालय सात किलोमीटर अंतरावर होतं. खिशात दमडी नसल्यामुळे प्रिया चालत निघाली, दोन तासांनंतर प्रियाचा प्रवास पूर्ण झाला. तिथे पोहचल्यानंतर बाबा त्या कंपनीत नोकरी करत नसल्याचं समजलं. पुन्हा मुंबईची गाडी पकडली आणि मुंबईत दाखल झाली.

मुंबईत आल्यानंतर नेमकं काय करायचं असा प्रश्न प्रियासमोर उभा राहिला. तिनं स्टेशनवरती भीक मागायला सुरूवात केली. भीक मागत असताना मुंबई सुरत ही गाडी फिक्स केली. सहा महिने भीक मागितली. त्यावेळी तिकडं सुरतला उतरायचे आणि मुंबईत आल्यानंतर विरारला उतरायचे असं प्रियाने सांगितले. एक दिवस गाडीतून उतरत असताना प्रियाचा पाय घसरला आणि प्रिया जोरात स्थानकात जोरात पडली. प्रियाकडे उपचार करण्या इतपत पैसे नसल्याने ती स्टेशन परिसरात काही दिवस तशीच पडून होती. ही बातमी तिच्या मामांना समजली. त्यानंतर मामानी प्रियाला एका खासगी दवाखान्यात दाखल केलं.

उपचार पुर्ण झाल्यानंतर मामाने प्रियाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि तिला महिला वस्तीगृहात दाखल केलं. शिकलेली प्रिया काही दिवस तिथं रमली परंतु काहीवेळाने तिला तिथला कंठाला त्यामुळे ती तिथून निघून जाण्याचा विचार करू लागली. कारण बाहेरची दुनिया वेगळी असताना आपण इथं बंदीस्त आयुष्य का जगायचं असा विचार तिच्या मनात येऊ लागला. एकदा लाईटबील भरण्यासाठी बाहेर आलेल्या प्रियाने तिथून पळ काढला. निघाल्यानंतर प्रियाने काही तृतीयपंथींयांच्या ओळखी केल्या. त्यांनी प्रियाला प्रचंड मदत केली.

नालासोपारा परिसरात प्रिया तृतीयपंथीयांच्यात राहायला गेली. तिथं तिला राहण्यासाठी जागा दिली तसेच त्याच्यात प्रियाला समावून घेतलं. प्रसन्न झालेल्या प्रियाने उरलेलं शिक्षण पुर्ण करण्याचा निर्णय घेतला. कारण आपल्या न्याय किंवा हक्क मिळवायचा असेल तर शिक्षण गरजेचं आहे. हे सगळं करीत असताना प्रियाने एका ठिकाणी नोकरी सुध्दा केली. हे सगळं करीत असताना प्रियाने तृतीयपंथीयांसाठी काम करणारी एक एनजीओ जॉईन केली. त्यामुळे तिच्यासारख्या अनेक मैत्रीनींना तिला न्याय किंवा हक्क मिळवून देता आहे. हे सगळं करीत असताना प्रियाने कायदा अभ्यासक्रमात पदवी मिळवली.

कायद्याचं शिक्षण घेतं असतााना आपल्या सारख्या एकल महिलांसाठी कसा न्याय मिळवून देता येईल याचा सतत विचार करून प्रियाने अभ्यास केला. त्यामुळे तिचा अनेक प्रकरण मिटवताना त्याचा अधिक फायदा झाला. प्रिया आज नायगांव परिसरात राहत असून अनेक तृतीयपंथींना मदत करीत आहे. हे सगळं करीत असताना आपल्याला राजकारणात उतरल्यानंतर त्याचा अधिक फायदा होईल हे डोक्यात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचं काम करायला सुरूवात केली. प्रिया प्रभावीपणे काम करीत असल्यामुळे तिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी सदस्याची जबाबदारी देण्यात आली.

शरीरात होणारे बदल आणि बाहेरचं जग माहीत नसलेल्या एखाद्या इसमाला जसं जग नवीन वाटतं, तसं त्या वेळी मला वाटतं होतं. वयाच्या 16 व्या वर्षी आईनं घरातून हाकलून दिलं, कोणत्याही नातेवाइकानं दखल घेतली नाही. आयुष्याचा पाढा वाचत-वाचत शिक्षण पूर्ण केलं आणि तृतीयपंथीयांच्या न्यायासाठी आणि सामान्य जनतेसाठी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला - प्रिया पाटील

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News