तृतीयपंथी ते उद्योजक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 23 September 2020

तृतीयपंथी ते उद्योजक

माझं नाव माधुरी सारोदे शर्मा समाज्याने नाकारलेल्या हिजडा जमातीमध्ये जन्म घेतल्यानंतर किती दु:ख असतं, ते जो भोगतो, ते त्यालाच माहीत असतं. हे मानवनिर्मित प्रॉडक्ट आहे, तरीही त्याला समाजात अजूनही मानाचं स्थान मिळालेलं पाहावयास कुठेही मिळत नाही. मी माझ्या आयुष्यात खूप काही भोगलं आहे. त्याबद्दल एकच सांगेन की, सहनही होत नाही आणि बोलताही येत नाही, अशी परिस्थिती बऱ्याचदा समाजात तुम्हाला बघावयास मिळत आहे. मी माझ्या बुद्धी आणि कौशल्याने एक उद्योग उभारला आहे. माझ्यासारख्या असंख्य बहिणींना त्यांची गरज आहे, त्यासाठी मी आजही प्रयत्न करत आहे असं  माधुरी सारोदे शर्मा यांनी सांगितलं.
 
सुरुवातीला मला सांगायला आनंद होतोय की, मी भारतातला पहिला तृतीयपंथी आहे... ज्याचं लग्न एका पुरुषाशी झालं आहे. मुळात माझं लहानपण हे मुंबईतल्या कुर्ला परिसरातलं... त्यामुळे आजूबाजूला असलेल्या लोकांची वर्दळ ही लहानपणापासूनच पाहिलेली आहे. लहानाचा मोठा कुर्ल्यात झालो, कुटुंबात लहान असल्यामुळे आणि मुलगा असल्यामुळे आई-बाबा खूप लाड करायचे. कुर्ल्यातील नेहरूनगर परिसरात शाळा होती. शाळेत असल्यापासून शरीरातले बदल जाणवत होते. हे असे का होत आहे, हे तेव्हा काही समजत नव्हतं असंही माधुरी सारोदे शर्मा यांनी स्पष्ट केलं.
 
कालांतराने  माधुरी सारोदे शर्मा यांच्या शरीरात खूप मोठे बदल होतं असल्याचं आतून जाणवू लागलं.  माधुरी सारोदे शर्मा यांना पुरुषी कपड्यांपेक्षा मुलींचा ड्रेस खूप आवडू लागला, मुलींसारखं नटू लागला.  माधुरी सारोदे शर्मा यांना रंगरंगोटी आणि नाचकाम आवडू लागलं. असा सगळा प्रकार  माधुरी सारोदे शर्मा यांच्या घरी माहीत झाल्यानंतर घरचे डॉक्टर आणि देवऋषी यांच्याकडे घेऊन गेले. एकुलता एक पोरगा असं का करतोय, काय झालंय याला, या कारणामुळे घरचे एकदम हादरून गेले होते.
 
त्यातच  माधुरी सारोदे शर्मा या दहावी नापास झाल्या. शिक्षणात बरी नसल्यानं घरच्यांनी घरी बसण्याचा सल्ला दिला. कारण- पुढे शिकून तू काय करणार आहेस? तुला घरीच बसावं लागणारं असल्यानं काही शिकू नको, असा सल्ला आई-वडिलांनी  माधुरी सारोदे शर्मा यांना दिला. त्यानंतर कुर्ल्यातील एका चष्मा कारखान्यात नोकरी मिळाली. ११ वी आणि १२ वी  माधुरी सारोदे शर्मा यांनी नाईट कॉलेजमध्ये जाऊन पूर्ण केलं. तिथे दोन-तीन वर्षं काम केल्यानंतर त्यांना एका एनजीओत काम मिळालं. तिथं गेल्यानंतर आपले लोक भेटल्यासारखे त्यांना वाटू लागले. तिथे असताना त्यांनी तीन ते चार वर्षांत सगळं काही शिकून घेतलं आणि नंतर त्यांना तिथे १७ हजार पगार झाला.
 
 माधुरी सारोदे शर्मा यांचं वय जसं वाढत गेलं, तसं त्याच्यात अधिक बदल होऊ लागले. त्यांना माहीत होतं की, मी जर का हिजड्यांसारखा राहू लागलो, तर मला घरचे कधीच स्वीकारणार नाहीत. त्यामुळे दबा धरून तसाच त्यांनी घरी दिवस ढकलत राहिल्या. आईनं  माधुरी सारोदे शर्मा यांना सांगितलं होत की, घरातून साडी नेसून बाहेर जायचं नाही. आणि घरात साडी नेसून यायचं नाही. त्यानंतर  माधुरी सारोदे शर्मा यांनी त्यांची कामं सगळी फेसबुकवरती अपलो़ड करत गेल्या. तेव्हा त्यांचं कामं एका व्यक्तीला आवडायला लागलं. २०१४ ला  माधुरी सारोदे शर्मा या त्या व्यक्तीला भेटल्या आणि त्यानंतर त्या सतत भेटतं राहिल्या. २०१६ ला आत्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न केल्यानंतर घरच्यांना ते आवडलं नाही. त्यामुळे दोघेही दुसरीकडे भाड्यानं राहू लागले. लोक म्हणतात- लग्नानंतर करिअर संपतं; पण लग्नानंतर खरं तर माझ्या आयुष्याला सुरूवात झाली.
 
आपण जसे युट्यूबला गाणी ऐकत असतो. तशी  माधुरी सारोदे शर्मा या सुध्दा गाणी ऐकत होत्या. आपण एखादा व्हिडीओ पाहत असताना आपल्याला दुसरा ऑप्शनल म्हणून दिसते असतो. तसा एक व्हिडीओ  माधुरी यांना दिसला. त्यांनी तो पाहिला त्यामुळे त्यांच्या मनात आपण इथं काहीतरी शिकू शकतो असं डोक्यात आलं. त्यामुळे त्यांनी व्हिडीओ पाहणं सुरू केलं. त्यातले काही व्हिडीओ त्यांनी पुन्हा-पुन्हा पाहिले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, आता आपण सुध्दा हे बनवू शकतो. काही काळाने त्यांनी वस्तू बनवायला सुरूवात केली. त्या वस्तूंना चांगला भाव मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलांना आवडणा-या वस्तू घरी बनवू लागल्या. त्याचं मार्केटींग फेसबूकच्या माध्यमातून केलं. त्यानंतर त्यांनी परिसरात एक स्टॉल सुरू केला आणि त्यांचा व्यवसाय एक उदरनिर्वाहाचं साधन होऊन बसलं. तयार केलेल्या वस्तू त्या कार्यक्रमात किंवा समारंभा ठिकाणी ओळखीच्या लोकांना विकू लागल्या.
 
मी हा व्यवसाय सुरू केल्यानंतर अनेक तृतीयपंथीयांनी याकडं वळावं यासाठी त्यांना मार्गदर्शन करू लागल्या. कारण तृतीयपंथीयांना नोकरी मिळणं खुप अवघड आहे. त्यांना भीक मागून आयुष्य काढावं लागतं. अनेकदा अपमानित वागणूक दिली जाते. त्यामुळे प्रत्येकाने एखादी कला शिकावी जी तुम्हाला रोजचं जेवण मिळवून देईल. यासाठी माझ्या काही गोष्टी मी सोशल मीडियावर शेअर करायची कारण माझ्यासारख्या अनेक तृतीयपंथीयांचं चांगलं व्हायला हवं.
 
हे सगळं करत असताना मला व्यवसाय अवघत झाला आणि त्यामध्ये बदल कसे करायचे हे माहित झाले. या क्षेत्राकडे अनेक तृतीयपंथी वळल्यानंतर मी एलआसी एजंट व्हायचं ठरवलं कारण आपण ते केल्यानंतर अनेक तृतीयपंथी तिकडे वळतील. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात तृतीयपंथी दिसायला पाहिजे, यासाठी प्रत्येक क्षेत्रात काम करायचं ठरवलं आहे.
तृतीयपंथी म्हणजे नेमकं काय आहे, यासाठी आम्ही निवडकं शाळेत जाऊन मार्गदर्शन सुध्दा केलं. तिथं गेल्यानंतर आम्हाला मानसन्मान मिळाला कारण समजा, एखाद्याला घरात असं लहानमुलं असेल तर त्यांच्याशी कशा पध्दतीने वागायला. हवं त्याचबरोबर आपच्यासोबत जे झालं ते त्यांच्यसोबत व्हायला नको म्हणून मुंबईतल्या काही निवडक शाळेत मार्गदर्शन केलं होतं. यामुळे तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेलं...
इतर तृतीयपंथीयांच्या पेक्षा माझं आयुष्य निराळ राहिलेलं आहे, कारण मी इतर तृतीयपंथीयांची अवस्था पाहिलेली आहे आणि पाहतेय. त्यामुळे मी तृतीयपंथी असल्याचं लवकर घरी सांगितलं नाही. तसेच माहित झाल्यानंतर घरची नियमावली पाळली. त्यामुळे माझ्या आयष्यात संघर्ष झाला, पण तो तितका नाही झाला. माधुरी सारोदे शर्मा,  उद्योजक

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News