'या' गोष्टींमुळे येऊ शकतो तुमच्या नात्यात दुरावा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 18 April 2019

आपल्या आयुष्यात नातं हि फार महत्वाची गोष्ट असते. प्रत्येकजण ही नाती सांभाळण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र आपल्या काही गोष्टींमुळे या नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो.

नाती अत्यंत नाजुक असतात. नाती सांभाळून ठेवण्याची गरज असते कारण लहान-लहान चुकांमुळे दुरावा निर्माण होतो. नाती मजबूत ठेवण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज भासते. असाच रिलेशनशिपमध्ये दुर्लक्ष करून चालत नाही. आपल्या ही काही चुकांमुळे नाती तुटत असतील तर वेळ आहे आपल्या चुका सुधारण्याची.. 

  • आपल्या जोडीदाराला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नये. जसे प्रत्येक गोष्टीत त्याला टोचून बोलणे, चुका काढणे. 

  • खोटे बोलणे, धोका देणे, ईर्ष्या, आणि अपमान हे सर्व एका अस्वस्थ नातं असल्याचे संकेत आहे. याने साथीदाराला हर्ट करणे किंवा त्यावर आपला वर्चस्व गाजवण्यासारखे आहे.

  • आपला जोडीदार एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत असल्यास त्याला दोषी ठरवण्याआधी नेमकं कारण जाणून न घेता तर्क लावणं चुकीचे आहे. जोडीदाराशी मोकळेपणाने बोलण्याने गैरसमज दूर होतात. 
    • परवानगी घेतल्याविना आपल्या पार्टनरचा फोन किंवा ई-मेल बघणे वादाचे कारण होऊ शकतं, याने आपलं नातं धोक्यात पडू शकतं कारण लहान-लहान गोष्टी कधीही दुरावा निर्माण करू शकतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News