'त्यांनी' नाशिकचे नाव इतिहासात नोंदवले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

वय वर्षे २१ ते ७४ दरम्यानच्या सायकलपटूंनी ही अनोखी सफर करून नाशिकचे नाव इतिहासात नोंदविल्याचा अभिमान वाटत आहे.पानिपत ते नाशिक हा १४ ते २२ जानेवारीदरम्यानचा प्रवास करून आलेल्या ३२ सायकलिस्टचा सत्कार पानिपतकार विश्‍वास पाटील यांच्या हस्ते चिंतामणी मंगल कार्यालय, गंगापूर रोड येथे झाला.

नाशिक रोड : पानिपत भूमीवर २५९ वर्षांपूर्वी लढलेला प्रत्येक मराठा सैनिक वेगळ्या जाती-धर्माचा होता. जातिभेद न पाळता सैन्य लढले. देशाला तारण्याकरिता छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन ‘पानिपत’कार व ज्येष्ठ लेखक विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केले. 

पानिपत ते नाशिक हा १४ ते २२ जानेवारीदरम्यानचा प्रवास करून आलेल्या ३२ सायकलिस्टचा सत्कार पानिपतकार विश्‍वास पाटील यांच्या हस्ते चिंतामणी मंगल कार्यालय, गंगापूर रोड येथे झाला. त्या वेळी ते बोलत होते. या आगळ्यावेगळ्या टीम पानिपतच्या सत्कार सोहळ्यात व्यासपीठावर नाशिक सायकलिस्टचे माजी अध्यक्ष व उद्योजक प्रवीणकुमार खाबिया, साहित्यिक डॉ. संतोष खेडलेकर, ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद धोपावकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या निर्मला खर्डे, कबड्डीच्या प्रशिक्षक शैलजा जैन, डॉ. प्रल्हाद डेरले, गोकुळ गिते उपस्थित होते.मोहिमेचे आयोजक डॉक्‍टर आबा पाटील यांनी सांगितले, की पानिपतवरून मराठे हरून आले होते. मात्र आम्ही जिंकून आमच्या रणभूमीवर परतलो आहोत.

वय वर्षे २१ ते ७४ दरम्यानच्या सायकलपटूंनी ही अनोखी सफर करून नाशिकचे नाव इतिहासात नोंदविल्याचा अभिमान वाटत आहे. या वेळी प्रा. चंद्रशेखर बर्वे, डॉ. संगीता पाटील, सुदर्शन जाधव, चंद्रकांत नाईक यांनी सायकल मोहिमेबाबतचे अनुभव कथन केले. अर्चना केकाण यांनी सूत्रसंचालन केले. संजय पवार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता टीम पानिपत, किशोर माने आणि आदर फाउंडेशन यांनी परिश्रम घेतले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News