"या" तीन गोष्टी करतील तुमचं वजन झपाट्याने कमी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 21 March 2020

आहारात केलेल्या छोट्याशा बदलामुळे तुम्ही वजन कमी करू शकता. सकाळी भरपेट ब्रेकफास्ट केल्याने संपूर्ण दिवस पचनसंस्था सुरळीत काम करते. त्यामुळे तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट करत असाल तर काही  गोष्टींचा समावेश करून तुम्ही वजन कमी करू शकता. 

मुंबई: बदलत्या वातावरणानुसार आहारात बदल करणे नेहमी गरजेचे ठरते. आपण जे खातो, पितो त्याचा थेट संबंध आपल्या शरीराशी होत असतो. त्यामुळे वजन वाढण्याचे कारण देखील तेच असते. आहारात केलेल्या छोट्याशा बदलामुळे तुम्ही वजन कमी करू शकता. सकाळी भरपेट ब्रेकफास्ट केल्याने संपूर्ण दिवस पचनसंस्था सुरळीत काम करते. त्यामुळे तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट करत असाल तर काही  गोष्टींचा समावेश करून तुम्ही वजन कमी करू शकता. 

अंडी खाल्याने तुमचं वजन कमी होऊ शकत. उकडलेल्या एका अंड्यामध्ये सुमारे ७८ कॅलरीज आणि व्हिटामिन डी असतात. याशिवाय ६ ग्रॅम प्रोटीन आणि महत्वपूर्ण पोषक तत्वे देखील असतात. या सर्वांमुळे हाडे मजबूत राहण्यास मदत मिळते. सकाळी ब्रेकफास्टमध्ये अंडी खाल्ल्याने दिवसभर भूक कमी लागते.  त्यामुळे दिवसभर आपण कमी खातो, आणि पर्यायाने वजन नियंत्रणात राहते. 

आरोग्यासाठी महत्वपूर्ण समजली जाणारी केळी देखील वजन कमी करण्यात महत्वाची ठरतात. केळी खाल्ल्याने वजन वाढते, असा काहींचा समझ आहे. मात्र केळी खाल्ल्याने वजन कमी होतं हे देखील तेवढंच खरं आहे.  केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. एका छोट्या केळ्यात १०० हून जास्त कॅलेरीज असतात आणि ३ ग्रॅम डाइट्री फायबर असतात. त्यामुळे दिवसभर शरीराला असलेली फायबरची आवश्यकता यातून पूर्ण होत असते. याशिवाय केळी पचण्यास सोयीस्कर असतात त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

दही हा तर एक उत्तम पर्याय आहे. वजन कमी करण्याचा हा प्रभावी उपाय मानला जातो. १०० ग्रॅम दह्यात जवळपास ३.५ ग्रॅम आणि २५० ग्रॅममध्ये ८.५ ग्रॅम प्रोटीन असतं. त्यामुळे ब्रेकफास्ट करताना दही खाल्यावर वजन कमी होईल. दही खाऊन मोठ्या प्रमाणात शरीरातील चरबी कमी करण्यात मदत मिळते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News