अंतिम वर्षाची परीक्षा घेणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे - राज्य सरकार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 July 2020

यामुळे पालक आणि विद्यार्थी दोघेही अनभिज्ञ आहेत असं याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. 

अंतिम वर्षाची परीक्षा घेणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे - राज्य सरकार 

कोरोना प्रादुर्भाव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झाला, कोरोना आळा घालण्यासाठी अनेक ठिकाणी आरोग्य विभागाने शाळा आणि कॉलेज ताब्यात घेतली. अजूनही काही शाळांमध्ये आणि कॉलेमध्ये संशयित रूग्णांना क्वारंटाइन केलं आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि भवितव्याचा विचार राज्स सरकारने परीक्षा रद्द करण्याच निर्णय घेतला होता. तसेच त्याबाबतचं पत्रही प्रतिज्ञापत्र राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं उच्च न्यायालयात सादर केलं होतं. 

विद्यापीठ अनुदान आयोगाला विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायचे अधिकार आहेत. राज्य सरकारला असा कोणताही अधिकार नाही, त्यामुळे हा निर्णय कायदेशीर नसून हा अध्यादेश रद्द करावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाला फक्त विद्यापीठांवर नियमन करण्याचा अधिकार आहे. 

महाराष्ट्रातील उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने कोरोनाची परिस्थिती पाहून राज्यातील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच व्यवसायिक आणि अव्यवसायिक परीक्षा घेतल्या जाणार नाहीत हेही स्पष्ट केलं होतं. निवृत्त शिक्षक धनंजय कुलकर्णी आणि अॅड. उदय वारुंजीकर यांनी राज्य सरकारने काढलेला आदेश रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 

कोरोनामुळे यंदाच्यावर्षीच्या परीक्षा रद्द केल्या, तर पुढच्यावर्षीच्या परीक्षा सुध्दा कशा काय घेतल्या जातील असा प्रश्न याचिकाकर्त्यांने केला होता. मात्र मूल्यमापन करण्याची ही पद्धती शिक्षणक्षेत्राला अनभिज्ञ आहे. यामुळे पालक आणि विद्यार्थी दोघेही अनभिज्ञ आहेत असं याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News