परदेशात करिअर करण्यासाठी 'या' गोष्टी महत्वाच्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

'माहिती तंत्रज्ञान' हे एक असे क्षेत्र आहे, ज्यामध्ये परदेशगमनाची संधी मिळण्याची शक्यता फार अधिक असते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपण सॉफ्टवेअर क्षेत्राचा विचार करणार आहोत. यामध्ये दोन प्रकारच्या कंपन्या असतात. गरजेप्रमाणे सॉफ्टवेअर बनवून देणाऱ्या इन्फोसिस, टीसीएस सारख्या कंपन्या, आणि माहिती तंत्रज्ञान, सायबर अशा क्षेत्रात सल्लागार असणार्या एक्सेन्चर सारख्या कंपन्या. अशा कंपन्यांमध्ये तुम्हाला नोकरी मिळाली, तर तुम्हाला पुढे परदेशवारीचे योग पत्रिकेत संभवतात. 

यासाठी, तुम्ही इंजिनिअरिंग करीत असाल तर बीई (आयटी) करून तुम्हाला पुढे एमटेक किंवा एमइ अथवा एमबीए करता येईल. अन्यथा बीएससी आयटी केले असेल तर एमसीए कोर्स करावा लागेल. त्यानंतर तुम्ही  एमबीए करू शकता.तुम्हाला एक्झीक्युटीव्ह एमबीए चा पर्याय सुद्धा खुला राहतो, ज्यामध्ये तीन चार वर्षांच्या अनुभवानंतर तुम्ही एमबीए करू शकता. सध्या एमबीए मध्ये तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावी लागते. एक्झीक्युटीव्ह एमबीए मध्ये तुम्ही थेट प्रवेश घेऊ शकता. अर्थात त्याची फी जास्त असते.  त्याचबरोबर तुम्हाला परदेशी भाषा येणे आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञानातील लोकांमध्ये जर्मन भाषा शिकण्याचे प्रमाण अधिक आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News