हृदयविकार टाळण्यासाठी या चाचण्या कराव्यात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 22 August 2019

आपले डॉक्टर आपल्याला या सर्व तपासण्या अथवा त्यातील काही सुचवू शकतात. या तपासण्यांमुळे हृदयविकाराचे ९५% अचूकतेने निदान करता येऊ शकते

टू डी ईकोकार्डिओग्राफी:

ईसीजी  ही तपासणी म्हणजे हृदयाची सोनोग्राफी होय. या तपासणीद्वारे डॉक्टर तुमच्या हृदयाच्या आतमध्ये पाहू शकतात. हृदयाच्या भिंती, झडपा (वॉल्व्हस) आणि हृदयाच्या आतील रक्तपुरवठा याबद्दल माहिती मिळते. ही तपासणी आणि ईसीजी आपल्याला वेगवेगळी माहिती देतात. त्यामुळे बऱ्याच वेळा त्या दोन्ही कराव्या लागतात. टू डी ईकोमध्ये आपल्याला हृदयाच्या वर्तमान आणि भूतकाळाविषयी माहिती कळते. या तपासणीसाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. ही एक अतिशय सोपी आणि खूप माहिती देणारी तपासणी आहे. बऱ्याच वेळा एखादी शस्त्रक्रिया होणार असल्यास त्याची पूर्वतयारी म्हणूनदेखील ही तपासणी सुचविली जाऊ शकते. ती हृदयाचे कार्य कसे चालू आहे, ते दर्शविते. यामध्ये एक टू डी इंजेक्शन फ्रॅक्शन ही एक संख्या असते. ते आपल्या हृदयाची पंपिंग क्षमता दाखविते. सामान्य माणसाचे हृदय ५५% अथवा अधिक क्षमतेने पंप करते. याचा अर्थ असा नाही उर्वरित ४५% बंद पडले आहे. हृदयक्षमता ५५% पेक्षा कमी होते तेव्हा ते काळजीचे कारण आहे. त्याची विविध करणे असू शकतात. यात आपली हृदयक्षमता ३५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास मात्र आपल्याला हृदयविकार तज्ज्ञांचा त्वरित सल्ला घ्यावा लागू शकतो. 

स्ट्रेस टेस्ट (ट्रेडमिल टेस्ट):
काही वेळेला आपल्याला ईसीजीमध्ये बदल दिसत नसल्यास डॉक्टर आपल्याला ट्रेडमिल टेस्ट करायला सांगू शकतात. यामध्ये आपल्याला ईसीजी लावून ट्रेडमिलवर ९ ते १० मिनिटे चालण्यास सांगितले जाते. चालण्याची गती ही टप्प्याटप्प्याने वाढवली जाते. कधीकधी हृदयाचा रक्तपुरवठा आपण हालचाल करत नसाल, तर सामान्य असतो; पण व्यायाम केल्यावर तोच कमी पडू शकतो. त्यामुळे आपल्याला नियंत्रितरीत्या ट्रेडमिलवर चालविले जाते. यादरम्यान ईसीजीमध्ये काही बदल होत आहेत का, ते पाहता येते. या तपासणीमध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात भविष्याविषयी कल्पना येते. ही तपासणी साधारणपणे सुरक्षित असते; परंतु १ ते २ टक्के लोकांना तपासणी करताना धोका उत्पन्न होऊ शकतो. 

ईसीजी, टू डी ईको आणि कार्डियाक एंझंयम्स या तपासण्या एकमेकांसाठी पूरक आहेत पर्यायी नाहीत. त्यामुळे आपले डॉक्टर आपल्याला या सर्व तपासण्या अथवा त्यातील काही सुचवू शकतात. या तपासण्यांमुळे हृदयविकाराचे ९५% अचूकतेने निदान करता येऊ शकते. त्या बाह्यरुग्ण विभागात करता येतात व त्यासाठी रुग्णालयात ॲडमिट होण्याची गरज नसते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News