या विद्यार्थ्यांना मिळाला 'काठावर पास'चा पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 1 August 2020

एकीकडे गुणांचा सर्वोच्च शिखर असला तरी दुसरीकडे ३५ टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण होण्याचे प्रमाणही कमी नाही.

मुंबई : अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेला दहावीचा निकला अखेर जाहीर झाला. यंदा मार्काने सर्वोच्च शिखर गाढले. २४२ विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर टक्के मिळवले तर ८३ हजार २६३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केले. एकीकडे गुणांचा सर्वोच्च शिखर असला तरी दुसरीकडे ३५ टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण होण्याचे प्रमाणही कमी नाही. त्यात ग्रामीण भाग अघाडीवर आहे. सर्व विषयात ३५ मार्क मिळून पास झालेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास पाहणार आहेत.

धोंडू झाला धोडींबा

आपला धोडू पास झाला रे!!! म्हणत सुनिल जाधवच्या मित्रानी गावभर दवडी पीठली आणि आपला आनंद व्यक्त केला. आई- वडीलांनी औक्षण करुन जाधवचे तोंडभरुन कौत्यूक केले. तर काकांनी गावभर पेढे वाटले. हिंगोली जिल्ह्यातील माळहिवरा गावात सुनिल जाधव हारतो. सुनिल हा विसरभोळा मुलगा आहे. कोणतीही गोष्ट कायम त्यांच्या लक्षात राहत नाही. मात्र सुनिलने दहावीची परीक्षा दिली आणि सर्व विषयात ३५ मार्क मिळून पास झाला. त्यामुळे संपु्र्ण माळहिरवा गावाला आनंत झाला. संपुर्ण निकाल पाहून सुनिला आश्चर्याचा धक्का बसला. त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं आपण पास होणार आहेत. त्यामुळे आनंदाला पारावार उरला नाही. गावातील सर्व मंडळी सुनिलला धोंडू नावाने ओळखतात. मदतीच्या वेळी धावून जाणार धोंडू सर्वांचा लाडका आहे. धोंडू पास झाल्याची वार्ता जेव्हा मित्रांना कळाली तेव्हा सर्वांनी धोडूंची गुणपत्रीका व्हाट्सअॅप स्टेट्स ठेवली. धोंडूला सर्वजन एकेरी हाक मारणारे आज धोंडीबा नावाने बोलवू  लागले.  

कष्टाचं फळ

जगात जर्मनी भारतात परभणी अशी ओळख असलेल्या परभणी ख्याती आहे. पुर्णा तालुक्याची धनगर टाकळी गावचा दिपक डुकरे या विद्यार्थ्यांनी सर्व विषयात ३५ मार्क मिळवले. ५०० पैकी १७५ मार्क मिळून दिपक चर्चेचा विषय बनला. ३५ टक्क्याचा मानकरी दिपकची ओळख राज्यभर पसरली. दिपकला शिक्षणासाठी परभणी शहरात ठेवले होते. परदेश्वर विद्या मंदीर शाळेत शिकणारा दिवस अहिल्याबाई होळकर वसतिगृहात राहत होता. दिवसभर शाळा, सकाळी कोचिंग क्लासेस, रात्री अभ्यास करायचा,  असा दैनंदीन दिनक्रम ठरलेला. कठोर अभ्यास करुन दिपकने दहावीची परीक्षा दिली. परीक्षेचा निकला लागला आणि ३५ चक्के मिळवून दिपक पास झाला. शेवटी कष्टाचे फळ मिळाले. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावण पसरले होतो. अक्षर खराव अल्यामुळे कमी मार्क मिळाले अशी प्रतिक्रीया दिपकने व्यक्त केली.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News