आयपीएलमध्ये या खेळाडूंनी घेतल्या आहेत अधिक विकेट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 19 September 2020

आयपीएलमध्ये या खेळाडूंनी घेतल्या आहेत अधिक विकेट

आजपासून आयपीएलचा १३ मोसम सुरू होणार आहे. पण यंदाचा मोसम भारतात खेळवला जाणार नसून तो दुबईत खेळवला जाणार आहे. कोरोनाचं सावट असताना सामने कसे होतात आणि व्यवस्थित होतील अशी शंका बीसीसीआयला होती. परंतु मार्चमध्ये होणारं आयपीएल रद्द केलं दुबई आयोजन करण्यात आलं आहे. आतापर्यंत भारतात १२ मोसम खेळवण्यात आले, परदेशातीवल खेळाडू प्रत्येक संघात असल्याने खेळाला अधिक रंग चढला. आज आयपीएल देशभरातून पाहिलं जातं. पण आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधीक विकेट गोलंदाजी माहिती घेणार आहोत.

क्रिकेटमध्ये जितकं फलंदाजाला महत्त्व तितकचं महत्त्व गोलदाजांना सुध्दा आहे. कारण एक बाजू चांगली असून चालत नाही. दोन्ही बाजू चांगल्या असल्यातरचं सामना जिंकू शकतो हे माहित असल्याने दोन्ही बाजूचा विचार करून संघात खेळाडूंचा भरणा केला जातो. आयपीएल मर्यादीत षटकांचं असल्यामुळे संघात चांगल्या खेळाडूंचा भरणा केला जातो. चांगले खेळ किंवा गोलंदाजी करणा-या खेळाडूंना त्याचं संघात ठेवलं जातं. मागच्या चार मोसमापासून अनेक खेळाडू एकाच संघात खेळत असल्याचे चित्र आहे.

आत्तापर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळणा-या लसित मलिंगाने आयपीएलच्या मोसमात अधिक विकेट घेतले आहेत. १२२ मॅचमध्ये मलिंगाने भेदक गोलंदाजी करीत १७० विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे तो पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटलचा फिरकी गोलंदाज अमित मिश्राने १४७ मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करून १५७ विकेट घेतल्या आहेत. त्याच्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगचा क्रमांक लागतो तो तिस-या क्रमांकावर आत्तापर्यंत त्याने १६० मॅचमध्ये १५० विकेट घेतल्या आहेत. यंदाच्या मोसमात तो खेळणार नसल्याचे चेन्नईच्या संघाला मोठा फटका बसला आहे.

ब्रावो ने चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी अनेकदा अडचणीच्या काळात मदत केली आहे. तो चौथ्या क्रमांकावर असून त्याने १३४ मॅचमध्ये १४७ विकेट घेतल्या आहेत. हैदराबाद कडून खेळणारा भुवनेश्वर कुमारने ११७ मॅचमध्ये १३३ विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर सहाव्या क्रमांकावरती आर. अश्विन असून त्याने १३९ मॅचमध्ये १२५ विकेट घेतल्या आहेत. सुनिल नरियनयाने ११० मॅचमध्ये १२२ विकेट घेतल्या आहेत, उमेश यादवने ११९ मॅचमध्ये ११९ विकेट घेतल्या आहेत. रविंद्र जडेजा दहाव्या क्रमांकावर असून त्याने १७० मॅचमध्ये १०८ विकेट घेतल्या आहेत.

आयपीएलच्या झालेल्या मोसमात आत्तापर्यंत अनेक रेकॉर्ड झाले आहेत, तसेच अजून रेकॉर्ड होणार आहेत. एवढं मात्र खरं आहे की, आयपीएलच्या खेळामुळे क्रिकेट अधिक फास्ट झालं. आजपासून १३ मोसम सुरू होतोय, पाहूया यंदाच्या आयपीएलमध्ये किती रेकॉर्ड होतायत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News