आयपीएलमध्ये या खेळाडूंनी केल्या आहेत ४ हजार धावा; पण त्यांचं एकही शतक नाही

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 11 September 2020

आयपीएलमध्ये या खेळाडूंनी केल्या आहेत ४ हजार धावा; पण त्यांचं एकही शतक नाही

आयपीएलमध्ये या खेळाडूंनी केल्या आहेत ४ हजार धावा; पण त्यांचं एकही शतक नाही

२००८ साली सुरू झालेलं आयपीएल किती प्रसिध्द होईल. हे कोणालाही माहित नव्हतं. कारण मर्यादीत शतकातले सामने प्रेक्षकांना आवडतील का ? तो खेळ व्यवस्थित होईल का ? तसेच बाहेरचे आणि भारतातील खेळाडू एकत्रितपणे खेळतील का ? असे अनेक प्रश्न त्यावेळी क्रिकेट प्रशासनाला पडले होते. परंतु या खेळाने सर्व काही बदलून गेलं. खेळाडूंना संध्या मिळाल्या. अनेक खेळाडूंचं आयपीएलमुळे आयुष्य बदललं, आत्तापर्यंत आयपीएलचे १२ हंगाम झाले. तसेच १३ वा हंगाम सुरू होणार आहे. अनेक स्थानिक खेळाडूंना असं वाटतं असतं आपल्यालाही आयपीएलमध्ये स्थान मिळावं. तसेच खेळातलं कौशल्य दाखवून राष्ट्रीय खेळात स्थान मिळावं. राज्यनिहाय खेळाडूंचा फॅनवर्ग हा वेगळा आहे. कारण त्यांची फलंदाजी पाहण्यास अनेकजण उत्सुक आहोत.  

आयपीएल सुरू झाल्यापासून अनेक खेळाडूंनी धावा काढल्या आणि शतकही ठोकलं. परंतु असे तीन खेळाडू आहेत, त्यांच्या धावा अधिक आहेत, परंतु त्यांचं अजून आयपीएलमध्ये शतक झालेलं नाही. पण त्यांच्या धावा ४ हजारांच्यावरती आहेत.

रॉबीन उथप्पा

हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. एकहाती मॅच जिंकण्याची त्यांच्यात क्षमता असल्याचे त्याने अनेकदा दाखविले आहे. तसेच तो कोलकत्ता नाईट राईडर्सकडून अनेक वर्षे आयपीएल खेळला आहे. त्याने ७ व्या हंगामात ६६० धावा केल्या होत्या. आत्तापर्यंत उथप्पाने १७० सामने खेळले असून ४४२ धावा काढल्या आहेत. झालेल्या खेळात आत्तापर्यंत त्याने २४ अर्धशतकं आणि सर्वाधीत ८७ धावा केल्या आहेत. पण अजून त्याला शतक करता आलेलं नाही.

एमएस धोनी

हा जगातला एकमेव खेळाडू असेल, की ज्याने त्यांच्या कॅप्टन कारर्दीत अनेक सामने भारताला जिंकून दिले. त्यामुळे तो जगभरात अधिक प्रसिध्द झाला. आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे  आत्तापर्यंत धोनीने १९० सामन्यात ४४३२ धावा केल्या आहेत. धोनीने २३ आपलं अर्धशतक पुर्ण केलं असून अद्याप त्याला एकही शतक पुर्ण करता आलेलं नाही. विशेष म्हणजे धोनीची सर्वाधीक धावसंख्या ८४ आहे.

शिखर धवन

धवन हा खेळाडू मैदानावर खूप आक्रमक असल्याचं पाहायला मिळतं कारण धावसंख्या नेहमी हलती ठेवणं फलंदाजाचं जसं काम असतं, ते तो नेहमी पुर्ण करतो. अनेकदा चांगल्या संघातील गोलंदाजांची धुलाई शिखर धवनने केली आहे. त्याने १५९ सामन्यात ४५७९ धावा केल्या आहेत. तसेच ३७ वेळा अर्धशतक पुर्ण केलं आहे. नाबाद ९७ अशी त्या सर्वोच्च धावसंख्या आहे. विशेष म्हणजे त्याने आत्तापर्यंत ५२४ चौकार मारले आहेत. यावेळी तो दिल्ली संघाकडून खेळणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News