या खेळाडूंनी १५ पेक्षा अधिक सिक्स आयपीएलमध्ये मारले आहेत
या खेळाडूंनी १५ पेक्षा अधिक सिक्स आयपीएलमध्ये मारले आहेत
या खेळाडूंनी १५ पेक्षा अधिक सिक्स आयपीएलमध्ये मारले आहेत
नवी दिल्ली - भारतात २००८ साली आयपीएल सुरू झालं आणि षटकारांची आतषबाजी सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही, कोरोनामुळे यंदाचं आयपीएल दुबईत सुरू होणार आहे. आत्तापर्यंत १२ वर्षात आयपीएल मध्ये मोठे बदल झाले, तसेच पराक्रम सुध्दा झाले आहेत. सिक्स पाहण्यासाठी काहीजण आयपीएलचे सामने पाहत असतात, कारण त्यांची इच्छा प्रत्येक ओव्हर पुर्ण होत असते. आयपीएलच्या आत्तापर्यंत झालेल्या सीजन मध्ये अनेक खेळाडूंनी १५ पेक्षा अधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.
१ महेंद्रसिंग धोनी
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा मोठे सिक्स मारण्यासाठी प्रसिध्द आहे. आयपीएलच्या झालेल्या मोसमात त्याने ८ वेळा १५ पेक्षा अधिक सिक्स मारले आहेत. विशेष म्हणजे आत्तापर्यंत महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये अधिक सिक्स मारले आहेत.
२ सुरेश रैना
रैनाने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १९४ षटकार मारले आहेत. तसेच ८ मोसमात १५ पेक्षा अधिक सिक्स मारले आहेत.
३ ख्रिस गेल
सिक्सरचा राजा म्हणून ख्रिस ग्रेल जगभरात प्रसिध्द आहे. त्याने जलदगतीने १००० सिक्स आयपीएल मोसमात मारले आहेत. तसेच त्याने आयपीएलच्या ८ मोसमात १५ पेक्षा अधिक सिक्सर मारले आहेत.
४ एबी डिव्हिलियर्स
दक्षिण आफ्रिकेचा हा स्टार खेळाडू आहे, त्याने आत्तापर्यंत संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे एकहाती सामने जिंकण्याचं कसब त्यांच्या अंगी आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएल मध्ये २१२ षटकार मारले आहेत. त्याचबरोबर ८ वेळा १५ पेक्षा अधिक सिक्स मारले आहेत.
५ केरोन पोलार्ड
ताकदीच्या जोरावर त्याने आत्तापर्यंत अधिक सिक्स मैदानाबाहेर मारले आहेत. १७६ सिक्स आयपीएलमध्ये त्याच्या नावावर आहेत, तसेच १५ पेक्षा अधिक षटकार त्याने ७ वेळा मारले आहेत.