"हे" लोक बोलण्यात अधिक पटाईत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 4 October 2019

जगात अनेक लोक हे डावखुरे असतात. पूर्वीच्या काळात डावखु-या व्यक्तींबद्दल समाजाची विचारसरणी अत्यंत वेगळी होती.

लंडन: जगात अनेक लोक हे डावखुरे असतात. पूर्वीच्या काळात डावखु-या व्यक्तींबद्दल समाजाची विचारसरणी अत्यंत वेगळी होती. त्यामुळे डाव्या हाताने लिहिणाऱ्या किंवा कोणतेही काम करणाऱ्या व्यक्तीला त्याचे पालक किंवा शिक्षक उजव्या हाताने काम करायला लावत, मात्र सध्याच्या काळात प्रत्येक क्षेत्रात डावखुऱ्या व्यक्तींनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

ऑक्‍सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी 4 लाख लोकांच्या मदतीने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. तसेच एखादा व्यक्ती डावखुरा म्हणून का जन्माला येतो, याबद्दल देखील शास्त्रीय अभ्यास सुरू असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.

उजव्या हाताने काम करणाऱ्या व्यक्तींपेक्षा डावखुरी व्यक्ती या बोलण्यात अधिक पटाईत असतात. असा निष्कर्ष जगातील प्रख्यात ऑक्‍सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात समोर आला आहे. हे लोक बोलण्यात अधिक पटाईत असतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News