या वस्तू घरात नकारात्मक निर्माण करतात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 27 September 2019

घरात स्वच्छता, निरोगी वातावरण, खेळती हवा, या सगळ्यांचा उपयोग झाला पाहिजे, तरच ते घर सगळ्यांना आकर्षक वाटेल.

घर म्हंटले की, नुसत्या चार भिंती नसून त्यात माणसे राहत असतात. घरात राहण्यासाठी नुसती माणसे असून उपयोग नाही. घरात स्वच्छता, निरोगी वातावरण, खेळती हवा, या सगळ्यांचा उपयोग झाला पाहिजे, तरच ते घर सगळ्यांना आकर्षक वाटेल.

घरात राहात असताना माणसांबरोबरच वस्तू, कपडे यांचा वापर साहजीकचं होत असतो. मात्र जर घरात जुन्या वस्तूंची योग्य वेळी विल्हेवाट लावली पाहिजे. जुने कापडं, जुने पेपर हे जास्त घरात साठवून ठेवल्याने घरात एक प्रकाची नकारात्मक ऊर्जा तयार होते. फाटलेले जुने कपडे किंवा चादरी देखील घरात नकारात्मक मानसिकता आणि उर्जा निर्माण करतात.

बरेचदा लोक फाटलेल्या- जुन्या कपड्यांचा गठ्ठा अलमारी किंवा दिवाणात ठेवतात. तथापी, काही लोक निरुपयोगी झालेले असे कपडे सोडतात आणि ते कबर किंवा कपाटाच्या खालच्या भागात ठेवतात. यासाठी असे कपडे दान करावे किंवा इतर कोणत्याही कामात वापरावेत. तसेच कधीही फाटलेले कपडे घालू नका. टॉवेल्स फाटलेले किंवा जुने नसावेत. हे सर्व गरीबीचे प्रतिक आहे.   
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News