पुरुषांसाठी महत्वाच्या आहेत या फूटवेअर टिप्स

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 May 2019

फूटवेअर ड्रेसिंगचा महत्त्वाचा भाग असतात. याशिवाय तुमचे स्टाईल स्टेटमेंट अपूर्ण मानले जाते. दरम्यान, फूटवेअरते पहिले काम असते ते म्हणजे पायांची सुरक्षा मात्र यामुळे स्टाईलही बदलते. जर तुमचे फूटवेअर चांगले असतील तर तुमच्या स्टाईलला आणखी चार चाँद लागतात. जाणून घ्या पुरुषांसाठी फूटवेअरच्या काही टिप्स...

रंगाची योग्य निवड
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जे फूटवेअर निवडता आहात त्यांचा रंग तुमच्या कपड्यांना मॅच व्हायला हवा. तुम्ही जर वेगळ्या रंगाचे शूज निवडत असाल तर याबाबत काळजी घ्या की तुमचा लूक त्यामुळे बिघडू नये. जसे ग्रीन सूटवर गडद पिवळ्या रंगाचे शूज घातले तर तुम्ही कार्टून दिसाल. त्यामुळे याऐवजी तुम्ही लाईट ब्राऊन अथवा काळ्या रंगाचे शूज निवडाल तर स्मार्ट दिसाल. 

कलेक्शनमध्ये या रंगाचे शूज महत्त्वाचे
आपल्या फूटवेअर कलेक्शनमध्ये ब्लॅक लेदर शूज, ब्राऊन लेदर शूज आणि ग्रे शूज जरूर ठेवा. हे असे रंग आहेत जे कोणत्याही आऊटफिटवर छान दिसतात. यासोबतच व्हाईट स्नीकर्सही कलेक्शनमध्ये असल्यास तुमचा कॅज्युअल लूक अजून स्टायलिश दिसू शकतो. 

फंक्शननुसार ठरवा फूटवेअर
तुम्ही एखाद्या सोहळ्याला जात आहात तर त्यानुसार फूटवेअर निवडा. जर ऑफिस पार्टी आहे अथवा फॉर्मल पार्टी आहे तर यावेळी तुम्ही स्नीकर्स अथवा स्पोर्ट्स शूज घालून जाणे योग्य नाही. अशा वेळेस फॉर्मल शूज बेस्ट आहेत. एखाद्या मित्राच्या पार्टीमध्ये जायचे असेल तर तुम्ही आरामात स्नीकर्स घालून जाऊ शकता. यावेळी हा बेस्ट ऑप्शन असेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News