'या' प्रसिद्ध गायकाच्या मुलाशी होणार नेहा कक्करचे लग्न?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 January 2020
  • आता इंडियन आयडॉलच्या मंचावरच नेहाची लग्नगाठ जुळणार असल्याची चर्चा करण्यात येत आहे.

मुंबई : बॉलिवूड फेम गायिका नेहा कक्कर आपल्या ब्रेकअपमुळे खूप चर्चेत आली होती. त्यावेळी ती डिप्रेशनमध्ये गेल्याचे देखील बोललं जात होते. मात्र आता इंडियन आयडॉलच्या मंचावरच नेहाची लग्नगाठ जुळणार असल्याची चर्चा करण्यात येत आहे. सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणसोबत नेहा कक्करचे जुळणार असल्याची चर्चा होत आहे. 

इंडियन आयडॉलमध्ये आदित्य नारायण हा प्रत्येक एपिसोडमध्ये नेहा कक्करसोबत फ्लर्ट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आगामी इंडियन आयडॉलच्या मंचावर उदित नारायण आणि अलका याग्निक दिसणार आहे. यावेळी नेहा कक्कर आणि उदित नारायण देखील दिसणार आहे. यावेळी उदित नारायण यांनी गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, हा सो मला फार आवडतो, मी सुरुवातीपासून तो फॉलो करत आहे, त्याचे कारण म्हणजे या शो मधील टॅलेंटेड कँडिडेट्स आणि दुसरं म्हणजे नेहा कक्करला सून करून घेणार आहे. 

यावेळी उदित नारायण यांची पत्नी देखील उपस्थित होती.  त्यांनी देखील या गोष्टीला सहमती दिली आहे.  यावेळी नेहा कक्करच्या आई वडिलांची देखील उपस्थिती होती. या सर्व गोष्टींवर आदित्य देखील खुश असल्याचे दिसत होता. यावेळी नेहा कक्कर हिने सांगितले की, मी एवढ्या लवकर लग्नाला तयार झाले तर मजा नाही राहणार.. या एपिसोडचे शूटिंग झाले असून त्याचे लवकरच प्रसारण करण्यात येणार आहे. 

या सर्व गोष्टी हा शो चा भाग असू शकतो, असे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे नेमकं काय ते एपिसोडच्या प्रसारणानंतरच समोर येणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News