या परीक्षा ठरल्याप्रमाणे होतील

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 23 August 2020

या परीक्षा ठरल्याप्रमाणे होतील

या परीक्षा ठरल्याप्रमाणे होतील

राष्ट्रीय सामाईक परीक्षा (जेईई) आणि राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी  होत असतानाचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून परीक्षा आहे त्या वेळेतच होणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून अधिकृत संकेतस्थळावर संपुर्ण माहिती दिली आहे. राष्ट्रीय सामाईक परीक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

कोरोनाच्या काळात या परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून ठरलेल्या वेळेत परीक्षा होतील असं स्पष्ट केलं आहे.

त्याचबरोबर जेईई मुख्य परीक्षा सुध्दा दिलेल्या वेळेत होणार आहे. ही परीक्षा १३ सप्टेंबरला होईल, याआधी सर्वोच्च न्यायालयानेही नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News