या कुपण धारकांना मिळणार धान्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 April 2020
  • अन्ननागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांची माहिती

मुंबई : राज्यातील एपीएल शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातील अन्नधान्य पुरवठा 1 मे ऐवजी आता 24 एप्रिल पासून करण्यात येणार असल्याची माहिती आज मंत्रालयात अन्न नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांन सोबत आयोजित करण्यात आलेल्या विभागाच्या आढावा बैठकीत अन्ननागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले .

राज्यातील नागरिकांना सध्य परिस्थितीत अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून नागरिकाची मागणी लक्षात घेता 1 मे ऐवजी येत्या 24 एप्रिल पासून आन्नधान्य वाटप करण्यात येणार आसल्याचे यावेळी डॉ कदम यांनी सांगितले . यासाठी डॉ, विश्वजीत कदम यांनी पुढाकार घेऊन तात्काळ अन्न नागरी पुरवठा विभागाच्या सचिव समवेत तातडीने बैठक घेऊन आढावा घेतला.

या वेळ विभागाची तयारी पूर्ण झाल्याचे तसेच राज्यात मोठ्य प्रमाणावर अन्न धान्यांचा साठा उपलब्ध असल्याचे या बैठकीला उपस्थित सचिव खंदारे यांनी सांगितले.

या बैठकीत राज्यातील नागरिकांना अन्नधान्य पुरवठा सुरळीत होण्यासाठी विभागाच्या वतीने चालु करण्यात आलेल्या ऍनलाईन ई-तक्रारीच्या तसेच टोलफ्री नंबर द्वारे 9 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत राज्यातील बहूतेक भागातून बर्याच तक्रारी प्राप्त झाल्या होत्या .त्या प्राप्त झालेल्या तक्रारीचे निराकरण करण्यात आले. राज्यातील सध्य स्थितीत आन्नधान्य पुरवठा तसेच मागणी या बाबतीतील तफावत दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

लवकरच स्वस्त धन्य दुकानांतून शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने डाळीचे वाटप करण्या बाबत विभागाच्या अधिकाऱ्यासोबत डॉ विश्वजीत कदम यांनी यांनी यावेळी आढावा घेतला .

राज्यातील गरीबांना तसेच गरजूं नागरिकांसाठी महत्वपूर्ण ठरत असलेली अशी शिवभोजन योजने च्या सध्य स्थितीबाबत आढावा घेऊन नविन वाढीव थाळी देण्या बाबत संबधित जिल्ह्यच्या जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक शिवभोजन केद्रवर कमीजास्त प्रमाणात मागणी प्रमाणे कोठा कमी जास्त करावा. तसेच वाढीव कोठ्या बाबत तात्काळ शासनास अहवाल सादर करावा .असे निर्देश वेळी डॉ कदम यांनी दिले.

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर करोना व्हायरस चे संकट निर्माण झाले असून या मुळे उध्दभवलेल्या संकटावर्ती मात करण्यासाठी लागु आसलेल्या संचारबंदीत राज्यातील स्वस्त धान्य दुकानातील अन्नधान्य पुरवठा शिधापत्रिका धारकांना सुलभ व्हावा यासाठी राज्य राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे .आशी माहिती डॉ कदम यांनी यावेळी दिली. सदर बैठकीला अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव संजय खंदारे तसेच विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News