मुलांच्या या भावनांकडे तातडीने लक्ष द्या..!

शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
Friday, 3 May 2019

घर सोडून पाळणाघर/प्ले ग्रुप/बालवाडीत जाताना मुलांना प्रारंभी असुरक्षितता वाटते. ती रडतातही. मात्र तिथलं वातावरण प्रेमळ, योग्य असल्यास मुलं तिथं रुळतातही. अन्यथा ती ताणतणावातच राहतात. आजकालच्या ‘डे केअर सेंटर्स’मध्ये मुलांच्या भावनिक गरजांचाही विचार होताना दिसतो. तसाच तो वयानं मोठ्या मुलांच्या संदर्भातही करावा लागतो. शाळेत जाणाऱ्या मुलांच्या बुद्धीवरही ओझं लादू नये, त्यांच्या मनावर ताण येईल अशा अपेक्षा ठेवू नयेत, त्यांना झेपणार नाही अशा वेगानं शिकवू नये... असं आग्रहानं प्रतिपादन केलं जातं, त्यामागं केवळ मुलांविषयीचा कळवळा नसतो. तसं करणं अशास्त्रीय असतं. ते शिकण्याच्या प्रक्रियेत अडसरच ठरतं, हा खरा मुद्दा आहे.

अलीकडच्या काळात जे मेंदूविषयक संशोधन झालं आहे, त्यातून हे स्पष्ट झालं आहे, की ताण, दडपण यांचा मुलांच्या शिकण्यावर नेमका उलट परिणाम होत असतो. हे थोडं समजून घेऊ. मानवी मेंदूचे तीन भाग असतात. पहिला सरीसृप मेंदू म्हणजे सर्वांत जुना मेंदू, ज्यातून जगण्यासाठीच्या आवश्‍यक क्रिया घडतात. दुसरा ‘मॅमेलियन ब्रेन’ किंवा सस्तन प्राण्याचा मेंदू. भावभावनांची सर्व केंद्रे या भागात असतात. सर्व भावनांचं नियंत्रण या भागातून होतं, त्यामुळे त्याला ‘भावनिक मेंदू’ म्हणतात. मानवी मेंदूचा जो तिसरा भाग आहे, तो फक्त मानवामध्येच आढळतो. तो म्हणजे नवं बाह्यक किंवा ‘निओकार्टेक्‍स.’ यानं मेंदूचा सुमारे ऐंशी टक्के भाग व्यापला आहे. माणसाच्या विचाराची सर्व केंद्रं याच भागात आढळतात. साहजिकच माणसाची शिकण्याची प्रक्रिया ही निओकार्टेक्‍समध्ये घडत असते. 

मुलांवर तेव्हा शिकण्यासाठी, मग ते अधिक गुण मिळवण्याचं असेल, रोज रोज गृहपाठ करण्याचं किंवा पाठांतराचं असेल, दडपण/ताण येतो तेव्हा काय होतं? तो रक्तपुरवठा ‘निओकार्टेक्‍स’ या भागाला व्हायला हवा, तो मॅमेलियन ब्रेनकडे होऊ लागतो. कारण, आता त्या भावना नियंत्रित करणं, हे काम मेंदूवर येऊन पडतं. मग शिकण्याची प्रक्रियाच थांबते. कुठल्याही प्रकारची चिंता किंवा भीती मनात असल्यास ते अर्थातच एकाग्र होऊ शकत नाही. मुलांची बुद्धी काम करेनाशी होते, कारण बौद्धिक कार्य करणाऱ्या चेतापेशींना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. अशावेळी मेंदू दिलेल्या बौद्धिक कामातून बाहेर पडतो. यातूनच कायमस्वरूपी, दूरगामी असे अनिष्ट परिणाम घडतात. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News