खुणावताहेत हे सर्वोत्तम धबधबे! 

मयुरी काकडे चव्हाण
Tuesday, 2 July 2019

पावसाळा सुरू होताच तरुणाईला वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे. वर्षभर भटकंती सुरूच असली तरी पावसाळ्यात मनसोक्त हिंडायला तरुणाईला विशेष आवडते. आता पावसाने धोधो बरसायला सुरुवात केली असून, तरुणाईला मुंबईनजीकचे फेसाळणारे धबधबे खुणावू लागले आहेत. त्यासाठी वन डे पिकनिकसाठी मुंबईनजीकचे काही ठिकाणं... 

पळसदरी : मुंबई-पुणे महामार्गावरच्या चौक फाट्यापासून १८ कि.मी. दूर आणि पळसदरी रेल्वे स्टेशनपासून दोन कि.मी. अंतरावर पळसदरी धबधबा आहे. रेल्वेमार्गाचा पर्याय असल्याने या ठिकाणी गर्दीचे प्रमाण जास्त असते. जेवणाची सोय या ठिकाणी होते. 

पावसाळा सुरू होताच तरुणाईला वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे. वर्षभर भटकंती सुरूच असली तरी पावसाळ्यात मनसोक्त हिंडायला तरुणाईला विशेष आवडते. आता पावसाने धोधो बरसायला सुरुवात केली असून, तरुणाईला मुंबईनजीकचे फेसाळणारे धबधबे खुणावू लागले आहेत. त्यासाठी वन डे पिकनिकसाठी मुंबईनजीकचे काही ठिकाणं... 

पळसदरी : मुंबई-पुणे महामार्गावरच्या चौक फाट्यापासून १८ कि.मी. दूर आणि पळसदरी रेल्वे स्टेशनपासून दोन कि.मी. अंतरावर पळसदरी धबधबा आहे. रेल्वेमार्गाचा पर्याय असल्याने या ठिकाणी गर्दीचे प्रमाण जास्त असते. जेवणाची सोय या ठिकाणी होते. 

झेनिथ : खोपोली शहरापासून २ कि.मी.वर असलेल्या झेनिथ धबधब्याच्या पाण्याचा फोर्स खूप आहे; पण तरीही तरुणाईला पिकनिकसाठी झेनिथला जाण्याचा मोह काही आवरत नाही. म्हणूनच शनिवारी-रविवारी या धबधब्यावर मोठी गर्दी होत असते. इथल्या प्रत्येक कोपऱ्यावर पंजाबी धाबे आहेत.

कोंडेश्वर : बदलापूरपासून सहा किलोमीटर अंतरावर कोंडेश्वरचा धबधबा आहे. इथे दोन धबधबे आहेत. बदलापूर पूर्वेकडून भोज-दहिवली शेअर रिक्षा उपलब्ध आहेत. कुंडात डोहदेखील आहे. येथे शंकराचे मंदिर असल्याने अनेक तरुण शिवभक्त मंदिरात जाऊन आधी दर्शन घेतात. त्यानंतर पावसाचा आनंद लुटतात.

मोहिली : कर्जतपासून ६ ते ७ कि.मी.वर उल्हास नदी पार करून मोहिलीत प्रवेश होतो. डोंगरावरून भिरभिरणारा वारा, हिरवीगार वनराई असे नयनरम्य दृश्‍य डोळ्यात साठवून ठेवावे, असे वाटते. धबधब्याजवळ थंड वातावरणात गरम गरम वाफाळता चहा आणि मक्‍याची कणसे खाण्याची मजा काही औरच आहे.

आषाणे : भिवपुरी-कर्जतदरम्यान भिवपुरीपासून पाच कि.मी.वर असणाऱ्या आषाणे गावाजवळील धबधबा हेही पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. इथे जाण्यासाठी भिवपुरीपासून रिक्षा मिळते. आषाणे ग्रामस्थ पर्यटकांना मागणीनुसार जेवण करून देतात.

थिदबी : पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. कल्याण-माळशेज रस्त्यावर घाटाच्या पायथ्याशी साबर्णे गावापासून पुढे थिदबी गावापर्यंत ३ कि.मी. कच्च्या रस्त्याने चालत जावे लागेल. 

भगीरथ : वांगणीपासून चार किलोमीटर अंतरावर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरलेला भगीरथ धबधबा आहे. बेडीसगावापासून धबधब्याकडे जाण्यासाठी पायवाट आहे. या ठिकाणी जेवणाची सोय नाही. 

जव्हार : पालघर जिल्ह्यातील जव्हार म्हणजे डोंगरदऱ्या, असंख्य धबधबे, दूरवर पसरलेल्या भातशेतीने नटलेले छोटेसे हिल स्टेशन. इथला हनुमान टेकडी, शिर्पा माळ, दाभोसा धबधबा ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. कसारा घाटाच्या अलीकडे बळवंतगड हा छोटासा किल्लादेखील पाहण्यासारखा आहे.

पळू : माळशेजघाटाआधी मुरबाडजवळ असणारा पळूचा धबधबा हे एक उत्तम स्थळ आहे. याच्यामागे असणारी भीमाशंकरची डोंगररांग पावसाळ्यात विलोभनीय दिसते आणि त्याचबरोबर आपण गोरखगड, सिद्धगड, मच्छिंद्रगड इत्यादी एक दिवसाचे ट्रेकसुद्धा करू शकतो.

खालील गोष्टी लक्षात ठेवा 
प्रवेशासाठी मनाई असणाऱ्या धबधब्यांवर जाऊ नका.
जीव धोक्‍यात घालणारे कुठलेही धाडसी प्रयोग करू नका.
सेल्फीसाठी धोक्‍याची ठिकाणे टाळा. 
दुचाकीवरून जात असाल तर दोनपेक्षा जास्त जणांनी एका मोटरसायकलवर प्रवास करू नये.  
पावसाळ्यात रस्ते निसरडे असल्याने दुचाकी, चारचाकी गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवा.
जोशात होश गमावूू नका. 
संयमाने गाड्या चालवा.
कुठल्याही पिकनिकला जाताना मद्यपान टाळाच. 
विंचू, साप यांपासून बचाव करण्यासाठी संपूर्ण पाय झाकले जातील अशी पादत्राणे वापरा. 
खोल पाण्यात जाणे टाळा. 
शेवाळापासून वाचण्यासाठी योग्य ती पादत्राणे वापरा. 
संबंधित यंत्रणांच्या सूचनांचे पालन करा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News