'हे' आहेत जगातील सर्वात लहान देश, जे मुंबईपेक्षाही लहान आहेत..

विनायक पाटील
Tuesday, 25 February 2020

मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे ज्यामधील ४३७.७१ चौरस किलोमीटर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येतं ज्यामध्ये १.८४ करोड ( २०११ ची जनगणना ) एवढी लोकसंख्या आहे.

मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून अधिक लोकसंख्या असलेले हे शहर स्वतःचं एक वेगळं अस्तित्व घेऊन जगत आहे. जर मुंबई बरोबर मुंबई उपनगराला जोडून घेतलं तर जगात पाचव्या क्रमांकाचं हे मोठं शहर आहे. रोजगाराच्या मोठ्या संधी येथे उपलब्ध आहेत त्याचबरोबर मोठ-मोठे व्यवसाय देखील इथे असलेले पाहायला मिळतात.

करोडोंच्या व्यवहाराबरोबर हे शहर संभाळणारी मोठी महानगरपालिका देखील आहे जी बृहमुंबई महानगरपालिका या नावाने ओळखली जाते. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे ज्यामधील ४३७.७१ चौरस किलोमीटर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येतं ज्यामध्ये १.८४ करोड ( २०११ ची जनगणना ) एवढी लोकसंख्या आहे. मात्र आज आपण मुंबई नाही तर मुंबईपेक्षा लहान असलेल्या आठ देशांविषयी जाणून घेणार आहोत. 

 

व्हॅटिकन सिटी - जगातील सर्वात लहान देश म्हणून व्हॅटिकन सिटीची ओळख आहे. व्हॅटिकन सिटीचे एकूण क्षेत्रफळ जाऊन तुम्हाला धक्का बसेल, कारण याचे क्षेत्रफळ ० किमी इतकं आहे. हो अगदी बरोबर ऐकलं तुम्ही, हे शहर ० किमी इतकंच छोटं आहे. कारण ख्रिश्चन धर्मीयांचे जगातील प्रबळ असे हे केंद्रस्थान! म्हणजेच त्यांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप तिथेच वास्तव्य करतात. म्हणून ‘व्हॅटिकन सिटी’ला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली आहे. आणि यामुळेच व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात छोटा देश आहे. 

 

मोनॅको - मोनॅको हा जगातील दुसऱ्या क्रमांकावरील छोटा देश आहे. मोनॅकोचे क्षेत्रफळ जवळपास २ किमी² इतकं आहे. मोनॅकोच्या तिन्ही बाजूला फ्रांस आहे तर अगदी १६ किमी अंतरावर इटली देशाची सीमा आहे. मोनॅकोचे क्षेत्रफळ २ किमी² असले तरी जगातील सर्वात जास्त घनता असलेला देश आहे. मोनॅको हा देशात ३३००० हजार लोक वास्तव्यास आहेत. मोनॅको देशाचे एक विशेष वैशिट्य जाणून घेतला तर तुम्हालाही आनंदाचा धक्का बसेल कारण येथील रहिवाश्यांना वैयक्तिक आयकर भरवा लागत नाही, यामुळेच अनेक खेळाडू तसेच उद्योगपती येथे स्थायिक झाले आहेत. 

 

नौरू - नौरू हा देश प्रशांत महासागरातील एक छोटा द्वीप देश आहे. ज्याचं क्षेत्रफळ २१ किमी२ इतकं आहे. नौरू देशाचं वैशिष्टय म्हणजे या देशाला राजधानी नाही आहे. लोकसंख्या घनतेच्या मानाने ६४९/किमी² इतकी घनता येथे पाहायला मिळते. तर १०००० लोग येथे वास्तव्यास आहेत. 

 

तुवालू - तुवालू हा प्रशांत महासागरात आणि पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. ज्याचं क्षेत्रफळ २६ किमी² इतकं आहे. यामानाने जगातील चौथ्या क्रमांकचा छोटा देश आहे. तुवालूमध्ये संसदीय लोकशाहीबरोबरच घटनात्मक राजेशाही आहे देखील आहे. येथील संसद १५ लोकांनी बनून मिळते. सदस्यांनी निवडून दिलेला पंतप्रधान कारभर चालवतो. १२,३७३ एवढी तुवालूची लोकसंख्या आहे. 

 

सान मारिनो - युरोप खंडातील तिसरा सर्वात लहान देश म्हणून सान मारिनोची ओळख आहे. हा देश पूर्णपणे इटलीमध्ये येतो. सान मारिनोचे क्षेत्रफळ ६१.२ किमी२ इतकं आहे तर लोकसंख्या २९,९७३ एवढी आहे.

 

लिश्टनस्टाइन - स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया या दोन्ही देशांच्या मधे वसलेला एक छोटा भूपरिवेष्ठित असा लिश्टनस्टाइन देशाची ओळख आहे. जगातील सहाव्या क्रमांकाचा लहान देश असून याचा बराच भाग डोंगराळ आहे. लिश्टनस्टाइनचे क्षेत्रफळ १६० किमी२ इतके आहे तर, ३६,२८१ इतकी लोकसंख्या आहे. 

 

सेंट किट्स आणि नेव्हिस - अमेरिका खंडातील स्वतंत्र असा लहान देश आहे तसेच लेसर अँटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. या देशाचे क्षेत्रफळ २६१ किमी२  इतकं आहे तर ४२,६९६ इतकी लोकसंख्या आहे. 

मालदीव - क्षेत्रफळ २९८ किमी२
माल्टा - क्षेत्रफळ ३१६ किमी२
ग्रेनेडा - क्षेत्रफळ ३४४ किमी२

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News