चॉकलेट खाण्याचे 'हे' आहेत उत्तम फायदे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 9 September 2020
  • लहान मुलांपासून ते प्रोढ व्यक्तीपर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चॉकलेट आहे.
  • चॉकलेटचे सुध्दा अनेक प्रकार आहेत.
  • डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, मिल्क चॉकलेट असे एक ना अनेक प्रकार आहेत.

मुंबई :- लहान मुलांपासून ते प्रोढ व्यक्तीपर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चॉकलेट आहे. चॉकलेटचे सुध्दा अनेक प्रकार आहेत. डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, मिल्क चॉकलेट असे एक ना अनेक प्रकार आहेत. चॉकलेटच्या याच नव्या रंग रुपामुळे लहान-थोर सारेच त्याच्या मोहात पडतात. अनेक जण इच्छा किंवा आवड म्हणून चॉकलेट खातात. पण, चॉकलेट खाण्याचे अनेक गुणकारी फायदे देखील आहेत. हे फार कमी जणांना माहित आहे. त्यामुळेच चॉकलेट खाण्याचे नेमके फायदे कोणते हे जाणून घेऊ सविस्तर. 

  • चॉकलेटमध्ये कोको बीन हा मुख्य घटक असून यामध्ये असलेल्या फ्लावनोल्समध्ये शरीरातील पेशींचे संरक्षण करण्य़ाची क्षमता असते. फ्लावनोल्स या घटकामुळे वयस्कर व्यक्तींची आकलन क्षमता, स्मरणशक्ती यांच्या कार्यामध्ये सुधारणा घडविण्यासाठी मदत होते.
  • अचानक रक्तदाब कमी झाल्यावर चॉकलेट खाल्ले तर तत्काळ रक्तदाब नियंत्रणात येऊ शकतो.
  • आजकाल अनेकांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आढळून येते. शरीरातील एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी चॉकलेट उपयुक्त ठरते.
  • चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंटस मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी चॉकलेट बाथ, फेशियल, पॅक आणि व्हॅक्स यासारखे पर्याय उपलब्ध झाले आहेत.
  • उतारवयात चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, त्वचा निस्तेज होणे यासारखे शारीरिक बदल होत असतात. परंतु चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी चॉकलेटचे सेवन जरुर करावे.
  • नैराश्यग्रस्त असताना चॉकलेट खाल्ल्याने मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे या काळामध्ये चॉकलेट खाणे कधीही उत्तम.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News