WhatsApp च्या नवीन फीचर मध्ये 'हे' आहेत बदल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 23 September 2020
  • व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता एक आनंदाची बातमी आहे.
  • इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच सेल्प डिस्ट्रिक्टिंग फीचर मिळणार आहे.
  • यामुळे मेसेज एक टाइम लिमिटच्या आत ऑटो डिलीट होतील.

नवी दिल्ली :-  व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता एक आनंदाची बातमी आहे. इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच सेल्प डिस्ट्रिक्टिंग फीचर मिळणार आहे. यामुळे मेसेज एक टाइम लिमिटच्या आत ऑटो डिलीट होतील. युजर्संना सेल्फ डिस्ट्रिक्टिंग टेक्स्ट सोबत सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फोटो आणि व्हिडिओ सुद्धा शेयर करण्याचा ऑप्शन मिळणार आहे. व्हॉट्सअॅप संबंधी ताजे अपडेट ठेवणारी वेबसाईट WABetainfo च्या माहितीनुसार, फोटो आणि व्हिडिओ स्वतः गायब करणाऱ्या फीचरला Expiring Media (एक्सपायरिंग मीडिया) नावाने लाँच करण्यात येणार आहे.

कसे काम करणार हे फीचर

हे सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर किंवा एक्सपायरिंग मेसेज फीचरचे एक एक्सटेंशन असणार आहे. युजर्संकडे सेल्फ डिस्ट्रिक्टिंग मेसेजच्या रुपाने फोटो, व्हिडिओ किंवा GIF फाइल पाठवण्याचा ऑप्शन असणार आहे. रिसिवर पाहिल्यानंतर हे मीडिया फाईल स्वतः गायब होईल.

 

 

खास बात म्हणजे यात डिलीट फॉर इवरीवन फीचर प्रमाणे This media is expired लिहिले जात नाही. हे पूर्ण प्रमाणे गायब होईल. याशिवाय सेल्फ डिस्ट्रिक्टिंग मेसेज साधारण मेसेज वेगळ्या फॉर्मेटमध्ये येईल. तसेच रिसिवरला आधीच संकेत मिळतील की ही फाईल गायब होणार आहे.

सध्या व्हॉट्सअॅप फीचरची टेस्टिंग करण्यात येत आहे. युजर्संपर्यंत पोहोचण्यासाठी यात कोणताही बदल पाहायला मिळू शकतो. याशिवाय कंपनीने मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचरवर काम करणार आहे. यासाठी युजर्स एक व्हॉट्सअॅप अकाउंटला चार डिव्हाईसमध्ये चालवता येणार आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News