'या' अभिनेत्याचे वडील आजही चालवतात बस 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 8 January 2020
  • या मालिकेत त्याच्यासोबत राधिका पंडितही होती. यानंतर यशने मोगिना मानासू सिनेमात राधिकासोबत दुसऱ्यांदा काम केलं.

मुंबई : अभिनेता कुमार गौडा उर्फ यश KGF मुळे खूपच चर्चेत आला. त्यानंतर तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला. त्यांच्या चित्रपटाने २०० कोटींची कमाई केली. तो आज ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. कर्नाटकमध्ये तो रॉकिंग स्टार नावाने प्रसिद्ध आहे. या सिनेमातील त्याचे डायलॉग आणि ऍक्टिंगमुळे त्याला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. मात्र एवढ्या मोठ्या सुपरस्टारचे वडील आजही सरकारी बस चालवत आहेत. 

यश आज भलेही सुपरस्टार असला तरी त्याचा जन्म एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. यशचे वडील KSRTC ट्रान्सपोर्ट सर्विसचे बस ड्रायव्हर होते. यश आज कोट्याधीश आहे, मात्र त्याचे वडील आजही बस चालवतात. त्याच्या कुटुंबातील सर्वचजण साधेपणा जपणारे दिसतात. 

यशची पत्नी राधिका पंडितही एक अभिनेत्री आहे. यशने टीव्ही मालिका नंदा गोकुलामधून आपल्या करिअरला सुरुवात केली. या मालिकेत त्याच्यासोबत राधिका पंडितही होती. यानंतर यशने मोगिना मानासू सिनेमात राधिकासोबत दुसऱ्यांदा काम केलं. यावेळी दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेक वर्ष दोघांनी आपलं नातं मीडियापासून लपवून ठेवलं. त्यानंतर त्यांनी लग्न केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News