हृदय विकार होण्याआधी मिळतात शरिराला हे 7 संकेत...

यिनबझ टीम
Monday, 3 February 2020

सध्या जगामध्ये हृदय विकाराचे प्रमाण वाढले आहे. माणसिक ताणतणाव, धगधग, धावपळ, दिवसाची अनियमितता, बदलेला आहार आणि शारिरीक कसरती अशा अनेक कारणांनी हृदय विकार होण्याच्या संधी असतात.

सध्या जगामध्ये हृदय विकाराचे प्रमाण वाढले आहे. माणसिक ताणतणाव, धगधग, धावपळ, दिवसाची अनियमितता, बदलेला आहार आणि शारिरीक कसरती अशा अनेक कारणांनी हृदय विकार होण्याच्या संधी असतात. हे होऊ नये म्हणून आपण काहीदा त्याची काळजीही घेतो, मात्र ही गोष्ट आपल्याला माहित आहे का की आपल्याला हार्ट अटॅक येण्याआधी 8 प्रकारचे संकेत आपल्या शरिराला मिळालेले असतात, जेणेकरून आपण त्यावर इलाज करू शकतो.

आपण नेहमीच छातीत दुखणे म्हणजे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असल्याचे समजतो, परंतु जर आपण स्त्रियांबद्दल बोललो तर हृदयविकाराच्या वेळी छातीत दुखणे आवश्यक नसते. त्यांना छातीत जळजळ होणे किंवा दबाव आणि चिंता यासारखे लक्षणे दिसतील. अशीच काही लक्षण पुढे दिली आहेत, ज्याच्या माध्यमातून आपण हृदयविकाराचा त्रास समजू शकतो.

1. थकवा येणे...
थकव्याचा अर्थ असा नाही की आपण बरेच काम किंवा वर्कआउट केल्यावर येणारा थकवा असेल, इथे थकवा म्हणजे तुम्हाला काही काम न करता किंवा शरिराची कोणतीच हालचाल न करता दीर्घकालीन थकव्याची जाणीव होत असेल, तर तो चिंतेचा विषय असू शकतो.

2. श्वासोच्छवासाची गती वाढणे आणि घाम येणे...
साधारणत: एखाद्याला समजून येते की आपल्या शरीराला कधी थकवा जाणवू शकतो किंवा बराच वेळ व्यायाम केल्यानंतर घाम येतो, पण काहीदा डोळ्यांसमोर सतत अंधार, श्वास लागणे आणि त्याबरोबर घाम येणे ही हृदय विकाराच्या आजाराची लक्षणे आहेत. ही बर्‍याचदा वाईट गोष्ट असते आणि अशा परिस्थितीत छातीत दुखणे किंवा छातीत जळजळ होण्याची समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
 

3. घसा, जबडा, पाठ आणि हात दुखणे...
हृदयविकाराचा झटका येण्याचे सर्वात सामान्य लक्षण डाव्या हातातील वेदना मानले जाते, परंतु हृदयविकाराची समस्या केवळ डाव्या हाताच्या वेदनांनीच दिसून येते असे नाही. हे दोन्ही बाजूंनी होऊ शकते, विशेषत: स्त्रियांमध्ये.
 

4. छातीवर दबाव येणे...
हृदयाच्या कोणत्याही धमनीमध्ये रक्तवाहिनीसाठी अडथळा येऊ लागतो. (काहीदा असे बरेचदा घडते) काहीजणांना वाटते की छातीत जळजळ होत आहे, तर काहींना छातीत टोचल्याप्रमाणे कळ येत असते. काहींना तर असे वाटते की छातीवर एक भारी वजन ठेवले आहे, त्यावेळेस काळजी घेण्याची गरज आसते.
 

5. चक्कर येणे आणि डोळ्यांसमोर अंधार येणे...
सकाळपासून जर कोणी काही खाल्ले नाही, त्याने अधिक काम केले आहे तर सामान्यत: अशी लक्षणे घडत असतात.  परंतु जर कोणी उभे असेल किंवा आरामात बसला असेल आणि असे घडले असेल तर मात्र ती धोक्याची घंटा होऊ शकते.
 

6. पाय, तळवे इत्यादी अवयवांना सूज येणे...
हे असे लक्षण आहे जे आपल्याला समजून येते की आपल्या शरिराचा एखादा भाग फुगलेला आहे. आपल्या शरिरातून जितका त्या अवयवास रक्तप्रवाह गरजेचा आहे, तितका होत नाही, त्यावेळी अशाप्रकारची सूज येते. काहीदा एखाद्या जखमेमुळे ही सुज येत असते, मात्र कोणतीही जखम नुसनही सुज येत असेल, तर हृदयाकडून योग्यरित्या रक्तपुरवठा न झाल्यामुळे ही सुज आल्याचे समजले जाते. काहीवेळेस मूत्रपिंडांवरही याचा परिणाम दिसून येतो.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News