हे 10 प्राणी आता संपूर्ण विश्वातून नाहीसे झालेत
विश्वामध्ये असे अनेक प्रलय आले आहेत, ज्यामुळे सृष्टीमध्ये मोठ्याप्रमाणात बदल घडलेत. अशाच काही बदलांमुळे प्राण्यांच्या काही प्रजातीच नष्ट झाल्या आहे. त्याच प्राण्यांच्या प्रजातींवर एक नजर टाकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
विश्वामध्ये असे अनेक प्रलय आले आहेत, ज्यामुळे सृष्टीमध्ये मोठ्याप्रमाणात बदल घडलेत. अशाच काही बदलांमुळे प्राण्यांच्या काही प्रजातीच नष्ट झाल्या आहे. त्याच प्राण्यांच्या प्रजातींवर एक नजर टाकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
मिस वॉलड्रॉन्स रेड कोलोबस
ही एक माकडांची प्रजात आहे, ती प्रजात 2000 सालापासून नाहीशी झाल्याचे म्हटले जाते. हे माकड लाल तोंडाचे असून त्याचा आकार हा मध्यम उंचीचा असल्याचे म्हटले जाते.
यांगत्से रिव्हर डॉल्फीन
हा मासा फक्त चीन या देशात आढळत होता. चीनमधल्या यागंत्से नदीत या माशांची प्रजात अढळत होती. या माशाचा रंग फिकट पाढंरा असल्याने ती सगळ्या डॉल्फिन माशांपेक्षा उठून दिसत असे.
कॅरेबियन मॉन्क सील
या कॅरेबियन मॉन्क सीलच्या शरीरात असलेल्या चरबीतल्या तेलासाठी या प्राण्याची मोठ्याप्रमाणात शिकार केली जात असे. ही सील फक्त जमैका आणि निकारागुआ दरम्यानचा सेरॅनिला तटावर अढळत होती.
अलाबामा पिगटो
खायला एकदम चविष्ट आणि शांत असलेले हे शिंपले अमेरिकेच्या माबाईल नदीत अढळत असत, 2006 नंतर ही प्रजात कमी झाली असल्याचे चित्र आहे.
डोडो
डोडो हा एक मॉरिशसमध्ये अढळणारा कबूतर पक्षी होता. असं म्हटलं जात की या पक्षाची उंची मोठी असल्याने याला उडता येत नसे, एका डॉयनॉसॉरच्या लहान पिल्ला इतकी या पक्षाची उंची होती, असंही काही ठिकाणी म्हटलं जातं.
स्टेलर्स सी काऊ
स्टेलर्स सी काऊ हा अलास्का आणि रशियाच्या दरम्यान अढळणारा जलचर प्राणी होता. समुद्रातल्या पाण्यात तयार होणाऱ्या वनस्पतींवर हा प्राणी उदरनिर्वाह करत असे.
क्वागा
क्वागा ही दक्षिण अफ्रिकेमध्ये आढळणाऱ्या झेब्राची प्रजात आहे. क्वागा या प्राण्याच्या कातडील्या त्या काळी विशेष महत्व असे आणि त्याच्या कातड्याची किंमतही मोठ्या प्रमाणात असल्याने शिकारीमुळे हळू हळू त्याची प्रजातच नामशेष व्हायला लागली.
आयरिश इल्क
हरिणाचे अनेक प्रकार आपण अजूपर्यंत पाहिले आहेत, मात्र त्याच्यापेक्षा उंचीने आणि शिंगाने मोठा असलेला हरिण म्हणजेच आयरिश इल्क होय. ही प्रजात आयरलँडच्या जंगलात आढळत असे.
व्हाईट टेल्ड ईगल
पांढऱ्या शेपटीचा गरुड म्हणून या पक्षाकडे पाहिल जात असे. हा पक्षी यूके येथे अढळतो. त्याच्या सुंदर दिसण्यामुळे लोक त्याची शिकार करत असत. मात्र काही दिवसांनी त्याच्या शिकारीवर निर्बंध आणले गेले, मात्र तोपर्यंत युकेमध्ये या प्रजातीचे सगळे गरूड संपण्याच्या वाटेवर होते.