शासकीय नोकर्‍यांसाठी एकच परीक्षा होणार; जाणून घ्या तरुणाईच मत 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  •  विविध विभागांच्या नोकरीसाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागायच्या, त्यामुळे पैसा, श्रम, वेळ खर्च व्हायचा आणि निकालाला विलंब होत होता.

मुंबई : सर्व शासकीय नोकऱ्यांची भरती एकच परीक्षेद्वारे घेण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला, त्यामुळे विद्यार्थ्यांना आता एकच परीक्षा द्यावी लागेल' असे मत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. दरवेळी विविध विभागांच्या नोकरीसाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागायच्या, त्यामुळे पैसा, श्रम, वेळ खर्च व्हायचा आणि निकालाला विलंब होत होता. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागायचा. त्यामुळे केंद्र सरकारने आता सर्व नोकऱ्यांसाठी एकच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाकडे तरुणाई कशी पाहते? या विषयावर यिनबझच्या विविध व्हॅट्सअॅप ग्रुपवर चर्चा करण्यात आली. त्यातील विद्यार्थी दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया आम्ही देत आहोत.

केंद्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य असून, यामुळे शिक्षित तरुण प्रचंड उत्साहित आहे. पुर्वी एका नोकरीसाठी 2 ते 3 परीक्षेला द्याव्या लागालयच्या. यामुळे बरेच तरुण शासकीय नौकरीपासून वंचित राहत होते.
- कृष्णा गाडेकर

केंद्र सरकारचा हा निर्णय स्वागताहर्त आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी कशी होतो यावर परीक्षेचे यश अपयश आपलंबून आहे. त्यामुळे अंमलबजावणी न होताच टिका करणे योग्य नाही.
-रुपेश गायकवाड
 
केंद्र सरकारचा हा निर्णय तरुणांना भटकवणारा आहे. तरुणांना नवीन परीक्षा पद्धतीची नाही तर नवीन रोजगाराची गरज आहे. RRB NTPC चे फॉर्म भरून झाले पण अजून परीक्षांचा पत्ता नाही. SSC भरतीचे निकाल लागत नाहीत. रेल्वेतील कित्येक पदे कमी करणार आहेत. बेरोजगारी लपवण्यासाठी आशा निर्नयांची वा... वाहा! केली जाते. 
-प्रतिक  भालेराव

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News