अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत होणार मोठे बदल 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 3 July 2020

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा प्राधुरभाव वाढत असल्याच्या पाश्वभूमीवर राज्यातील अभियांत्रिकी व इतर तांत्रिकी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया आणि नियमांमध्ये लवकरच बदल केले जाणार आहेत.

मुंबई : सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा प्राधुरभाव वाढत असल्याच्या पाश्वभूमीवर राज्यातील अभियांत्रिकी व इतर तांत्रिकी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया आणि नियमांमध्ये लवकरच बदल केले जाणार आहेत. तसेच हे बदल राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने  करण्यात येणार असून याद्वारे महाराष्ट्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना  राज्यातच शिक्षण घेण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतील अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात  ट्विट करून दिली आहे.  तंत्र शिक्षण विभागाच्या हालचालींवरून पुढच्या काही दिवसातच  यासंबंधित प्रस्ताव समोर येईल अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. 

कोरोना विषाणूच्या संकटामुळे यावर्षी दहावीचे निकाल हे जुलै महिन्याच्या शेवटी तर  बारावीचे निकाल हे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. तसेच अभियांत्रिकी प्रवेशाकरिता महत्वाची असणारी सीईटी परीक्षा ही देखील लांबणीवर पडली आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याकरिता बारावीच्या परीक्षेत मिळालेले गुण तसेच सीईटी परीक्षेत मिळालेले  गुण हे दोन्ही महत्वाचे असतात. परंतु कोरोना काळात सीईटी परीक्षा लांबणीवर पडल्यामुळे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचा हा लेटमार्क भरून काढण्याकरिता आणि विद्यार्थ्यांना ह्या पुढची प्रवेश प्रक्रिया ही सोपी जावी या दृष्टीने उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरु असल्याची  माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 महाराष्ट्र राज्यातील बहुदा सर्वच जिल्ह्यांमध्ये  दहावी, बारावीच्या निकालानंतर विविध अभ्यासक्रमासाठी होणारे प्रवेश हे दरवर्षी ऑनलाईन पद्धतीने होत असतात. असे असले तरी देखील  प्रवेश मिळाल्यानंतर निकालाचे प्रमाणपत्र आणि संबंधित कागदपत्र पडताळणीसाठी स्वतःहून महाविद्यालयात घेऊन जावी लागतात, परंतु आता कोरोनाच्या पाश्वभूमीवर प्रवेश प्रक्रिये सोबतच प्रमाणपत्र व कागदपत्र पडताळणी प्रक्रिये करता देखील ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रणालीचाच वापर करण्यात येणार असल्याचे समजते. अभियांत्रिकी प्रमाणे यंदा आयटीआय (व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय)  प्रवेशाची प्रक्रिया ही सुद्धा संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News