झाली धर्माची गच्छंदी

हेमंत दिनकर सावळे
Thursday, 10 October 2019

श्रध्दा लादली फार
गुरफटला समाज
ठसवून अवताराचा साज
दिवसेंदिवस दगडाचा चढला रुबाब

जेव्हा दगडं भांडतात आपापसात
तेव्हा श्रध्देचे दांडके
मोडतात कडाकडा

सामाजीकरणाची बुरुजं
ढासळतात पायरी दर पायरी
गच्छंती होते धर्माची कर्माची
विलयास जातो धाक तेव्हा

शक्कल लढवून गुणी
चमत्कार ढसवले मनी
जन्मले नवे रंग, नव अवतार

श्रध्दा लादली फार
गुरफटला समाज
ठसवून अवताराचा साज
दिवसेंदिवस दगडाचा चढला रुबाब

कर्मकांड फोफावले
श्रध्देच्या आड
फसले बहूजण अंधारी
मोडू पाश देऊन ललकारी
घे भरारी, घे भरारी

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News