गोव्यातल्या या बीचवर सहसा कोणीच जात नाही... हे आहेत, गोव्यातील टॉप7 बीच

सुरज पाटील (यिनबझ)
Saturday, 1 June 2019

गोवा हे फक्त समुद्र किनारी वसलेलं शहरच नाही तर त्यामागे तेथे असलेली हिरवाई, तिथल्या संस्कृती आणि वेगवेगळे प्रदेश हे तेथील महत्वाचे किस्से आहेत.

गोवा म्हटलं की समोर चित्र येतं ते म्हणजे शानदार बीच आणि त्या बीचवरचं रमनिय वातावरण. तिथला प्रवास आणि तिथला अनुभव एकंदरित अनुभवण्यासारखं आहे. हे सगळं गोव्यामध्ये गेल्यानंतर कळतं. गोवा हे फक्त समुद्र किनारी वसलेलं शहरच नाही तर त्यामागे तेथे असलेली हिरवाई, तिथल्या संस्कृती आणि वेगवेगळे प्रदेश हे तेथील महत्वाचे किस्से आहेत.

 आज असचं आपण काही खास बीच पाहाणार आहोत, जे अविस्मरणीय आहेतच, पण त्यामागे लपलेल्या रंजक कथादेखील आश्चर्य निर्माण करण्याजोग्या आहेत. गोवा शहरात असलेले एकूण 11 बीच आपण पाहाणार आहोत, जया ठिकाणी फक्त एकांतच नाही, तर तेथे असलेले अविस्मरणिय सौंदर्यदेखील बूलवून टाकणारे आहे. 

बटरफ्लाय बीच

नावाप्रमाणेच आकार असलेला हा आहे, गोव्यातील सौंदर्याने टॉपला असलेला बटरफ्लाय बीच. दोघा कपलसाठी एकांत मिळवून देणारं हे हक्काच ठिकाण म्हणून गोव्यामध्ये या बीचची चर्चा आहे. या बीचकडे जाण्यासाठी अगोंडा बीचवरून होडीचा उपयोग करून आपल्याला जावे लागेल.

काकोलेम बीच

हा बीच खूप कमी लोकांना माहित आहे. एकदम अरूंद आणि अखूड असलेल्या या बीचला टायगर बीच असेदेखील म्हटले जाते. या बीचच्या शेजारी मोठं जंगल असल्याने तेथील आकर्षण वाढल्यचे आपल्याला पाहायला मिळते. या बीचवर जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग 66 वर असलेल्या कोला गावाहून होडीचा प्रवास करून तेथे जाता येते.

गलजीबाग बीच

हा बीच जरी दिसायला साधारण असला तरी भयान शांतता या बीचवर आपल्याला पाहयला मिळते. या ठिकाणी ऑलिव रिडली प्रजातीचे कासव मोठ्या प्रमाणात येथे आपल्याला पाहायला मिळतात. याठिकाणी अनोख्या पध्दतीचे फूड्सदेखील आपल्याला पाहायला मिळतात. हा बीच, कानाकोना ठिकाणापासून 18 किमी लांब आहे. 

हॉलैंट बीच

हा बीच गोव्यातील मोठा बीच समजला जातो. येथे सर्वात निखळ आणि स्वच्छ पाणी पाहायला मिळतं. येथे आपल्याला मच्छीमारांनी रांगेत लावलेली जहाजे आपल्याला पाहायला मिळतील. ज्याचा उपयोग, पर्यटक फोटोसेशनसाठी करतात.

बेतुल बीच

हा बीच गोव्यातील चर्चेचं ठिकाण असलेल्या मडगावपासून फक्त 18 कि.मीच्या अंतरावर आहे. याठिकाणी मच्छीपालनाचा व्यवसाय देखील केला जातो. याच्याजवळ 17व्या शतकातला किल्ला आणि एक खाडी आहे. या बीचवर जाण्यासाठी तुम्हाला साल नदीचा प्रवास करावा लागतो. 

आरामबोल बीच

नावाप्रमाणेच आरामदायी आणि सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेला बीच म्हणून संपूर्ण गोव्यामध्ये आरामबोल बीचची ओळख आहे. हा बीच उखळ नसल्याने येथे जास्तप्रमाणात एंजॉय करण्यासाठी सर्व पर्यटक येथे येतात. 

अगोंडा बीच

मडगावपासून 37 किमीच्या अंतरावर असलेला शांत आणि वेगळ्या सौंदर्याने नटलेला समुद्र किनारा म्हणजेच अगोंडा बीच. येथील डोंगरावर आणि दाट झाडीवर असलेल्या गिधाडांच्या आवाजामुळे रात्रीच्या वेळेस कुठल्या दुसऱ्या देशात असलेल्याचा प्रत्यय त्यावेळेस येतो.

कोला बीच

नारळीच्या दाड झाडीत असलेला समुद्र किनारा म्हणजे कोला बीच. देशात सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या बीचपैकी एक म्हणजे कोला बीच होय. येथे जाण्यासाठी आपल्याला कानकोना बीचचा वापर आपल्याला करावा गालतो..

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News