इंटरनेट नसल्यामुळे ऑनलाइन वर्ग नाही; गावातील बाईंनी असे दिले गणिताचे धडे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 17 September 2020
  • कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउन करण्यात आले आहेत.
  • त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती. त्यात मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सरकारने ऑनलाइन शिक्षणप्रणालीची सुरूवात केली आहे.

चंद्रपुर :-  कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउन करण्यात आले आहेत. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती. त्यात मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सरकारने ऑनलाइन शिक्षणप्रणालीची सुरूवात केली आहे. परंतु त्यात ग्रामीण विद्यार्थाचे नुकसान होत आहे. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना मोठा फटका बसला हे काही वेगळे सांगायला नको. त्यात शैक्षणिक संस्था सुरक्षेसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी अनेक ठिकाणी ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. शहरांमध्ये किंवा सुस्थितीत असलेल्या कुटुंबांतील मुलांना ऑनलाइन वर्ग घेणे शक्य आहे. पण गावात जिथे पुरेशी वीज उपलब्ध नाही, तेथे ऑनलाइन क्लासेस कसे घेणार. त्यात कोरोना धोकादायक असला तरी मुलांचे वर्ष फुकट जाऊ नये ही प्रत्येकाचीच इच्छा आहे.

अद्यापही राज्यात कोरोनावर नियंत्रण आणणे शक्य झालेले नाही. यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात मात्र जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांनी अनोख्या पद्धतीचा अवलंब केला आहे. या शिक्षिकेने सार्वजनिक ठिकाण, रस्त्यांवर गणिते सोडवली आहे. त्यामुळे मुले खेळत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर गणिताचे धडे दिसत राहतील.

चंद्रपुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले यांनी सांगितले की, जर 'मिशन मॅथमॅक्टिस' यशस्वी झाले तर दुसऱ्या विषयांना घेऊनही प्रयोग केला जाईल. ते म्हणाले, शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांनी घरात अभ्यास सुरू ठेवावा, अशी आमची इच्छा आहे. यासाठी ग्रामीण भागात अभ्यासाचे वातावरण तयार केले जात आहे.  खेळत खेळत विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा हा 'मिशन मॅथमॅक्टिस' सुरू करण्यामागचा हेतू आहे.

 

 

याशिवाय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अभिकाऱ्यांनी पोम्बरना, बल्लारपूर, नगभीड आणि बम्हपुरी तहसील गावात मुख्य चौकात भितींवर पहिली ते पाचवीपर्यंतच्या गणित विषयांची प्रकरणे ऱेखाटली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्डिले यांनी सांगितले की, मुलांना अशा प्रकारचे शिक्षण आवडत आहे. ते आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत खेळत असताना गणित शिकत आहेत. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्या तरी मुलांमध्ये अभ्यास, गणिताविषयी आवड कायम राहावी यासाठी या अनोख्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. ते म्हणाले आहेत की, घोसगी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेचा माजी विद्यार्थी अक्षय वाकुलकर आता इंजिनीअर आहे. त्याने पहिल्यांदा आपल्या गावात मिशन मॅथेमॅटिक्स सुरू केले होते. ज्याच्या माध्यमातून मुले गणित विषयातील कठीण समीकरणे ही सहज शिकू शकत होते.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News