ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत ऍथलेटिक्‍समध्ये पदकांचा दुष्काळ कायमच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 10 July 2020

आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय ऍथलीटस्‌ घडवण्यावर आपण कोट्यवधीचा खर्च केला, पण त्यानंतरही ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत ऍथलेटिक्‍समध्ये पदकांचा दुष्काळ कायमच आहे,

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय ऍथलीटस्‌ घडवण्यावर आपण कोट्यवधीचा खर्च केला, पण त्यानंतरही ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत ऍथलेटिक्‍समध्ये पदकांचा दुष्काळ कायमच आहे, अशी खंत अव्वल ऍथलीट पी. टी. उषाने व्यक्त केली.ऑलिंपिक क्रीडा ऍथलेटीक्‍स स्पर्धेत अंतिम फेरी गाठलेली उषा पहिली भारतीय ऍथलीट होती. तिचे 1984 च्या लॉस एंजलीस ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या 400 मीटर अडथळा शर्यतीतील ब्रॉंझपदक एक शतांश सेकंदाने हुकले होते; पण त्या वेळी तिने नोंदवलेली 55.42 सेकंद वेळ अजूनही राष्ट्रीय विक्रम आहे. भारतीय ऍथलीटस्‌नी अद्याप ऑलिंपिक पदक जिंकलेले नाही, याची उषाला खंत आहे.

सध्याच्या परिस्थितीत आपल्याला आंतरराष्ट्रीय पदकाची शक्‍यता 50 टक्के असते. भारतीय क्रीडा प्राधिकरण तसेच भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघ सर्व प्रयत्न करीत आहे. 1998 पासून अनेक परदेशी मार्गदर्शकांची नियुक्ती झाली आहे. आपण पदके जिंकण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले; पण ऑलिंपिक पदकाच्या जवळपास पोहोचलेलो नाही, याचे कारण काय, याचा विचार करायला हवा, असे मत उषा यांनी व्यक्त केले.

एका आशियाई क्रीडा स्पर्धेत चार सुवर्णपदके जिंकलेल्या उषा म्हणाल्या, चांगल्या सुविधा असूनही आपण पदके जिंकत नाही, तेंव्हा नक्कीच काहीतरी चूक असणार. कदाचित योग्य ऍथलीटस्‌ना मदत होत नसावी. मात्र त्याबाबत मी नेमके काही सांगू शकणार नाही. आपण योग्य प्रकारे नवोदित ऍथलीटस्‌ची निवड झालेली नाही. त्याचबरोबर अजूनही स्पर्धकांना स्पर्धेचा योग्य आणि पुरेसा अनुभव मिळत नाही. त्याचबरोबर काही मोजक्‍या ऍथलीटस्‌ आणि मार्गदर्शकांना स्पर्धा अनुभव मिळतो, असेही त्यांनी सांगितले.

.................

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News